पान:मधुमक्षिका.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६ ४ )



दाबीत गेलो नसतों, तर ते आमच्या डोक्यांवर बसून आह्मांस त्रास देते, ह्यांत संशय नाहीं. परंतु, उठतां लात आणि वसतां बुकी दिली कीं, लागलेच ते आप- ल्या मर्यादेप्रमाणे वर्तुं लागतात.
  ह्या लोकांकडे पाहिलें ह्मणजे स्वातंत्र्य सुखाच्या महत्वाची कल्पना आह्मां इंग्लिश लोकांचे मनांत जशी येते, तशी दुसऱ्या कोणत्याही उपायाने यावयाची नाहीं. इंग्लंदामध्ये मला उपास काढावे लागोत, अथवा दारिद्यामुळे तेथें माझी हेळणा होवो, तरी तो माझा जन्मदेश स्वतंत्रतेचें माहेरघर आहे, असें मनांत येऊन जो मला आनंद होतो, व जें सुख होतें, तें, अनिर्वाच्य आहे. लोभ असावा हेविनंती.

मुक्काम स्ताकहोम.


 विनंती विशेष, दोन देशांतील लोकांच्या रीतिभा- तींत अंतर काय आहे, हें पाहणें असल्यास, दोहोंक• डच्या वरिष्ठ प्रतीच्या लोकांची तुलना करून पाहून - उपयोग नाहीं; कारण, त्यांत बहुतेक साम्यच आढळते. तर तो भेद समजण्यास उभय पक्षांकडील खालच्या प्रतीच्या लोकांची रीत ताडून पाहिली पाहिजे. ह्या पत्रांत मीं स्वीदनच्या लोकांचे थोडेसे वर्णन करण्याचे योजिले आहे.
 पाहूं गेलें असतां हे लोक जुलुमाखालीं अगदीं जेर आहेत. तरी ते इतर तशा लोकांप्रमाणे खुनशी व द्वाड नाहींत. तर त्यांच्यामध्ये सत्य व प्रामाणिकपणा हे गुण बरेच असून एकादें घोर कृत्य करण्यास त्यांचे हात वाहात नाहीत. आपण ऐकत होतों तितके दरोडे स्त्री-