पान:मधुमक्षिका.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६६ )



नजरेस पडली, तो रोग, तिनें बिलकूल न लाजतां आमच्या दृष्टीस येऊं दिला, ह्यावरून तिला त्याचें फारसे कांहीं वाटत नव्हतें, असें स्पष्ट दिसतें.
 ह्या शहरांत तोफखाना आहे. ही इमारत फार मोठी व सुशोभित आहे. परंतु हिजमध्यें युद्ध साहित्य फारसें नाहीं. प्राचीन काळीं जय मिळवून शत्रूंपासून हिरावून घेतलेलीं राजचिन्हें वगैरे ह्यांनी हा बहुतेक तोफखाना भरला आहे.देनिश, पालिश, साक्सन, आणि रुशियन, ह्या लोकांच्या निशाणांनी तर खोल्यांच्या खोल्या भरल्या आहेत. तीं दाहा पांच हजार सैन्यास पुरून उरतील, असें मला वाटतें. पुष्कळ नवीं नि. शा' करणे फार कठीण नाहीं; नवीन सैन्य ठेवणें हैं फार कठीण आहे, हें लक्षांत ठेविलें पाहिजे. अनेक नामांकित पुरुषांचें बहुमोल जवाहीर, उंची वस्त्रे, वगैरे पुष्कळ सामान त्यांत भरलें आहे.त्यांत गस्ताव्हस अदोलफस ह्मणून जो स्वीदनचा राजा, जर्मनीमध्यें लुटइने येथील लढाईंत इ. स. १६३२. ह्या वर्षी पतन पावला, त्याचीं, व तेथचाच राजा १२ वा चा- र्लस ह्याचीं, ह्मणजे जो इ. स. १७१८ मध्यें नार्वे देशांत फेदरिकशालच्या हल्ल्यांत गोळी लागून मरण पावला त्याची, अशी दोघांचीं अंतकाळचीं वस्त्रे त्यामध्ये आहेत. आतां, ह्या देशचा पराक्रमी, परंतु सध्या दरिद्र- दशेस मिळालेला राजा दुसरा चार्लस, ह्याच्या एक- दोन चमत्कारिक गोष्टी सांगतों.
 धैर्य आणि दृढ निश्चय हे गुण ह्या पुरुषाचेठायीं ह्यांची चिन्हें त्याच्या बालपणांत-पूर्णपणे बसतात.