पान:मधुमक्षिका.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३ )


बाटाडचे मिळत नसत; त्यामुळे बायाबापड्यांचे हातून- च आपली कामे करून घेणें आह्मांस भाग पडे. एक बायको आह्मांबरोबर आपल्या घोड्यावर बसून दररोज पंधरा पंधरा कोस चाले; आणि तिला तिंच्या मजुरीबद्दल दीड किंवा दोन आणे दिले ह्मणजे, ती आमच्या दाहादाहावेळ पांयांपडून फार उपकारी होई. ह्या कामी आह्मांस पुरुषांपेक्षां बायकाच बऱ्या वाटल्या. पुरुष नेहमीं कवडी कवडी करीत असतात; व ते सर्व- दा आपल्या घोड्याच्या शुश्रूषेंत मग्न असतात. त्यांस जलदी करण्याविषयीं सौम्य भाषणाने सांगून फळ नाहीं. रागाने पांचचार शिव्या हासडून बोलावें, तेव्हां ते अंमळ शुद्धीवर येतात; आणि त्यांनीं. मनापा- सून झटून काम करावे अशी इच्छा असल्यास, त्यांस थप्पड लगाविल्यावांचून दुसरा उपाय नाहीं. आह्मां इंग्लिश लोकांपासून हे लोक किती भिन्न आहेत पाहा! अशी थप्पड इंग्लंडांत कोणी सोशील काय ? नांव दे- खील काढू नका ! सोसण्याचें एकीकडेसच असूंद्या. उलटचा दाहा थप्पडा जर तो न लगावील तर मी आपले नांव बदलीन. हे लोक इतक्या नीचावस्थेस आले आहेत की, स्वाभिमान कसा असतो, हे ह्यांच्या- मध्ये कोणास ठाऊक देखील नाहीं, असें दिसतें. वला- कारास मान्य होणे हे आपले कर्तव्य आहे, असें ह्या लोकांस वाटतें. आह्मी त्यांस गोड शब्द बोलून ममता- ळूपणानें बागवूं लागलों ह्मणजे, ते लागलेच हरबऱ्याच्या झाडावर चढून आमची बरोबरी करायास लागतात. क्रुद्ध शब्दांनीं व कधीकधीं देहदंडनानें आलीं त्यांस