पान:मधुमक्षिका.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६२ )


भारी उद्धत, डौली, आणि मूर्ख आहे; आणि त्याचा गुरु लबाड दुराचारी आहे. ह्यावरून राजपुत्राची स्थि- ति कशी असेल, हें सांगावयास नको. विद्याभ्यासें- करून व सृष्टयवलोकनेंकरून जो ज्ञानांश मला प्राप्त झाला आहे, तो येथें दाखविण्याविषयीं मीं पुष्कळ प्रयत्न केला; परंतु, त्यांनी मला एकाद्या मूर्ख आगं- तुकासारिखें लेखिलें हें मी आतां खातरीने सांगतों कीं, मी कितीही परिश्रम केले, तरी आपले विचार स्वभाषेखेरीज दुसऱ्या कोणत्याही भाषेनें स्पष्टपणें मला सांगतां यावयाचे नाहीत; व मजसारिख्यास परक्या देशांमध्यें दांभिक पंडित झटल्यावांचून कोणी राहणार नाहीं. भरलेला होता, व अवाढव्य राज्य, पण तें ह्यांत लोक इतके हा देश पूर्वी पराक्रमी पुरुषांनीं ह्याच्या धाकाने एवढे रोमचें थरथरां कांपत होतें. असें असून दुर्बळ, अजागळ, आणि मित्रे कसे झाले, हें मला समजत नाहीं. ज्यानें पाहिजे त्याने येऊन ह्यांचें धनी व्हावें ह्यांस सावकाश लुटावें, आणि ह्यांनीं अवलां- प्रमाणे पळून छपून आपला लाजिरवाणा बचाव करावा, अशी अवस्था ह्यांस प्राप्त झाली आहे. स्वतः मीच दुर्दशेत आहे; तरी त्यांची अशी दीन दशा पाहून मला फार वाईट वाटतें येथें. सगळा बेबंद कारभार आहे. राजपुत्राबरोबर आह्मी सगळे तेरा असामी आहोत. कितीएक शहरांमध्यें आमचे मुक्काम पडले. परंतु, एकाही ठिकाणी आह्मांस सोईची जागा मिळाली नाहीं. एका शहराहून दुसरे शहरों जाण्यास आह्मांस