पान:मधुमक्षिका.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६१)


त्याची चांगली चलती झाली. ह्याचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. लिहिण्याच्या सरलतेविषयीं ह्याची मोठी आख्या आहे. त्याच्या एका पुस्तकांत त्याचीं दोन पत्रे छापलेली आढळलीं. तीं चांगलीं मनोरंजक वाटल्यावरून, त्यांतील तात्पर्य येथे उतरतों. ह्यांपैकीं एक पत्र क्राको मुक्कामचें व दुसरें स्ताकहोम मुक्कामचें आहे.
 मुक्काम क्राको, ता. २ आगष्ट सं० १७५८ इ. प्रिय मित्रा, विनंती विशेष - मी पोलंदांत येऊन दाखल झालों आहें, हें सदरील मुक्कामावरून सहजच तुझ्या लक्षांत येईल. माझा हा प्रवास संपेल तरी कधीं ? मी केव्हांतरी अमळ हायसा बसेन, मी लयोन्सामध्यें होतों, तेव्हां मला वाटे कीं, सर्व सुख काय तें आल्प्स पर्वताच्या पलीकडे आहे. पुढे इतालींत आलों, तेथेही चैन पडेना, आणि मनांत येई की, रोमिलिया- मध्ये गेलो ह्मणजे हें औदासिन्य नाहींसें होईल. हल्लीं येथें आहें, तरी तीच अवस्था; जिवाला बरें वाटत नाहीं. आज सात वर्षे झालीं, इतक्या अवकाशांत मी मेलों आहें किंवा जीवंत आहे, ह्याची वास्तपुस्त करणारा एकही प्राणी माझ्या दृष्टीस पडला नाहीं. सोयरे धायरे इष्ट मित्र ह्यांजपासून दूर राहिल्यामुळे मला वनवासी तपत्र्यांच्या एकांताचें दुःख भोगावें लागते; पण त्यांच्या समाधानवृत्तीचा एक लेशही माझ्या वांटास येत नाहीं.

 सध्या मी एका राजपुत्राच्या समागमें आहें. तेव्हां उपासमरीचें तूर्त मला भय वाटत नाहीं. त्याचा कार