पान:मधुमक्षिका.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६० )


जड शरीरचि आपण वा भ्रम,
प्रियतमे कळलें स्थिरजंगमें,
परम आवडि आपुलि आपणा,
वळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ १६ ॥
भ्रमकपाटहि तें जरि ऊघडे,
सुख उदंड अखंडचि सांपडे,
परम आवाडे आपुलि आपणा,
- यळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ १७ ॥
प्रियसुधा उपदेश गिराप्रती,
करुनि वामन तीस ह्मणे सती,
परम आवडि आपुलि आपणा,
वळख तुज टाकुनि मीपणा ॥ १८ ॥

.

क्राको आणि स्ताकहोम.

 ऑलिव्हर गोल्दस्मिथ ह्मणून एक नामांकित इंग्लिश ग्रंथकार होऊन गेला. तो इ० स० १७३१.त ऐरलंदामध्यें जन्मला. त्यास दबलीन, एदिंबरा,आणि लीदन येथील विद्यालयांत पुष्कळ ज्ञानप्राप्ति झाली. तो शाळेंतून निघाला तेव्हां त्याजपाशीं कांहींएक नव्हते. तथापि, ज्ञानवृद्धयर्थ यूरोपखंडांत पायी प्रवास करण्याचा त्यानें निश्चय केला. फ्लांदर्स, फ्रान्स, स्वित्सलँद, जर्मनी, इताली, इत्यादि देश त्यानें पाहिले. त्या प्रवासांत त्याला आपली किनरी वाज-वून व अन्यप्रकारें लोकांस रमवून उदरनिर्वाहाच्या वस्तु मिळवाव्या लागल्या. पुढे इ०स० १७५८ त. हा इंग्लंदांत परत आल्यावर, त्यास राजाश्रय मिळून