पान:मधुमक्षिका.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५९ )


परम आवडि आपुलि आपणा,
 वळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ ९ ॥
नयनिं राहु शशी करितां दिसे,
तसि अहंकृति त्यास्तव उल्लसे,
परम आवडि आपुलि आपणा,
 बळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ १० ॥
इतर ईश्वर मानिति त्यां जनां,
निजसुखार्धचि कीं तदुपासना,
परम आवडि आपुलि आपणा,
बळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ १९ ॥
हरिकृपेचि करूनि निजात्मता,
मिळलि त्यासचि तो प्रिय तत्वतां,
परम आवडि आपुलि आपणा,
 वळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ १२ ॥
नभ मठांतिल तेंचि मठांतरीं,
प्रिय असा कळल्या उपरी हरी,
परम आवडि आपुलि आपणा,
 वळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ १३ ॥
सहज तो मल जोचि अहो हरी,
प्रिय मुकुंद असे कळल्यावरी,
परम आवाड आपुलि आपणा,
 वळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ १४ ॥
कळालेया हरिची सकळात्मता,
मग कळे हरिभक्तिअखंडता,
परम आवाड आपुलि आपणा,
 वळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ १५ ॥