पान:मधुमक्षिका.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५८ )


सुनपने सदने विविधे धनें,
निजसुखार्थ समस्तहि साधनें,
परम आवडि आपुलि आपणा,
 वळख तूं तुज टाकुनि मोपणा ॥ ३ ॥
सकळ आवड काळवळें तुटे,
परि निजीं निजता न कधीं विटे,
परम आवड आपुलि आपणा,
 वळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ ४ ॥
प्रियहि अप्रिय होय घडीघड़ी,
परि कदापि न ये निज नावडी,
परम आवडि आपुलि आपणा,
 वळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ ५ ॥
वळखिने भलतें प्रिय मानिती,
नवल की प्रिय हैं जन नेणती,
परम आवाडे आपुलि आपणा,
 बळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ ६ ॥
निजबळे सुखही तरि सांपडे,
बहुत जो प्रिय तो बहु आवडे,
परम आवडि आपुलि आपणा,
 बळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ ७ ॥
स्वसुख तंचि सुषुप्तिं जसें उरे,
सदितरीं विषयांतहि ते स्फुरे,
परम आवडि आपुलि आपणा,
 बळख तूं तुज टाकुनि मीपण ॥ ८ ॥
सुख सुधाकर राहु अहंकृती,
निज ह्मणोनि तरी प्रिय मानिती,