पान:मधुमक्षिका.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५७ )



परंतु, काम पडेल त्याप्रमाणें होण्याजोगा ज्याचा स्वभाव आहे, तो फार सुख भोगितो. विद्याभ्यासादि कठीण कामें, जीं मनुष्यास स्वभावतः करावींशीं वाटत नाहींत, तीं करण्याचे काळ मनुष्यानें नेमून ठेवावे; आणि त्याप्रमाणें तीं नेमानें करावीं. परंतु जी कामे त्यांच्या स्वभावास आवडतात, त्यांची इतकी तजवीज ठेवण्याचें कारण नाहीं; कां कीं, वेळ फावला कीं, हीं केल्यावां- चून तो राहायाचाच नाहीं. ज्यामध्ये स्वहित साधत नाहीं, तें काम मनुष्य करीत नाहीं; जें जें तो करितो, त्यांत त्याचें साक्षात् किंवा परंपरया कांहींना कांहीं तरी हित असतें, असा मनुष्याचा स्वभाव आहे; - व मनुष्यास स्वप्रीति अति आहे. त्याविषयीं, आपले प्रख्यात कवि वामन पंडित, ह्यांचा एक पद्यात्मक ले- ख फार चमत्कारिक आहे. तो आतां आह्मी आपल्या प्रिय वाचकांस आदरपूर्वक सादर करितों.

प्रियसुधा
श्लोक.
पतिनिमित्त पती तुजला प्रिये,
प्रिय असे सहसा ह्मणतां नये,
परम आवड आपुलि आपणा,
वळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ १ ॥
पुरुषही स्वसुखार्थ सुखें स्त्रिया,
ह्मणत से सकळांहुनि त्या प्रिया,
परम आवड आलि आपणा,
वळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ २ ॥