पान:मधुमक्षिका.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५६ )



दृष्टीस पडतात. तेव्हां त्यावर विश्वास कोणी ठेवावा? स्वभाव हातीं येण्याला दोन उपाय आहेत. एक असा कीं, ज्या मोहक वस्तूंनीं आपलें व्रत भंगण्याची भीति आहे, त्या आपले नजरेपुढे घडोघडी आणून, व त्या समयीं दृढतम निश्चयानें वासना आवरून धरावी, तर एक आपणास त्यांपासून भय नाहीं; अथवा दुसरा उपाय हा कीं, त्या वस्तूंची व आपली आजन्मांत गांठ न पडे अशी कांहीं तजवीज योजावी, तर एक त्यांपासून आपला बचाव होईल; तिसरा मार्ग नाहीं. ह्यांतला पहिला फारच कठीण आहे, म्हणून तो कोणी करीत नाहीं; आणि दुसरा सोपा आहे, ह्मणून बहुतेक लोक तो अवलंबितात. मनुष्याचा खरा स्वभाव एकांतांत समजतो. चोरी, व्यभिचार, हीँ कर्मे करूं नयेत, असें सर्व लोक ह्मणतात, व त्या- प्रमाणें आपण वर्ततों असें होईल तितक्या तजविजीनें . जनांत ते दाखवितात. परंतु, सोन्याची रास व सुंदर ललना ह्यांशी एकांतीं गांठ पडून जो त्यांपासून अलिप्त राहील, तोच खरा साधु समजला पाहिजे. केवळ बाह्यात्कारें जें आचरण असतें, तें लोकांस भिऊ- न प्रायः असतें; मनापासून असत नाहीं. आणि एकांतांत एकटे आपणच, दुसरा कोणी नांहीं, तेव्हां तेथलें आचरण तें मात्र खऱ्या स्वभावानुरूप आहे, असें उघड दिसतें. जसा ज्याचा स्वभाव असतो, तसा त्याला व्यवसाय करण्यास सांपडला ह्मणजे तोच सुखी; नाहींतर स्वभावास आडवत नाहीं तो उद्योग करणें भाग पडलें, ह्मणजे त्या दुःखाला जोडा नाहीं.