पान:मधुमक्षिका.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५५)


होईल. ह्याप्रमाणेच स्वभावाचें आहे. झणजे, तो तीळतीळ धरीत किंवा सोडीत गेलें पाहिजे. निश्चय- बलेंकरून एकदम स्वभाव टाकण्याची किंवा धरण्या- .ची शक्ति अंगी असेल तर फारच चांगले; परंतु तें साधणे फार कठीण. नवी सवय लागावी ह्मणून तिची अहोरात्र तरी पाठ घेऊन उपयोगों नाहीं. तर मध्ये थोडीथोडी विश्रांतिही घेतली पाहिजे. तेणें- करून दोन गोष्टी होतात. एक ही कीं, आपण थकून कंटाळत नाहीं; व श्रम झाल्यावर जरा विसावा घेऊन कामाला लागलो ह्मणजे चांगली उमेद येऊन त्याजक डे चांगले लक्ष लागते. आणि दुसरी ही कीं, ज्या कामी आपण अपूर्ण व अनभ्यस्त आहों, तें एकसार- ख्या उत्कंठेनें धूम करीतच चाललों, तर त्यांत चुकी झाल्यावांचून राहात नाहीं, व तेणेकरून आपले श्रम वाया जाऊन उलटी भलतीच खोड लागण्याचा संभव असतो, तो टळतो. अडचणी विचारावांचून दूर होत नाहीत; विचार करण्यास चित्ताला स्थिरता पाहिजे; आणि ती स्थिरता विश्रांतीशिवाय होणें नाहीं; तेव्हां विश्रांति घेणें हें आवश्यक आहे, असें सिद्ध झालें. स्वेच्छेनुरूप आपला स्वभाव आपले हात लागला, असें जरी आपणास वाटले, तरी त्यावर अतिशयित भरंवसा ठेवून वेसावध राहूं नये. प्राचीन काळचे प्रख्यात विरक्त भक्त, जरी दृढनिश्चयानें कनक- कांतेचा त्याग करून अनेक तपें अरण्यांत एकांताम ध्यें बसत, तरी त्यांचीं देखील मनें पुनः बिघडत. अशा कथा आढळतात, व तशा गोष्टी कधीकधीं संसारांतही