पान:मधुमक्षिका.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५४ )


असा पटाईतपणा साधण्यास अतिशयित कष्ट लागता - व आतां, जरी त्यांच्या मानानें त्यांचा उपयोग नसतो तथापि, अशा गोष्टी अनेक आहेत की, त्यांत "वाघा- च्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो." स्वभाव स्वाधीन ठेवणें अथवा थोडा तरी पाल- टणे ही गोष्टही त्यापैकींच आहे. ह्या कारणास्तव आप- ला मूळचा कुस्वभाव टाकावा अशी ज्याची इच्छा असे- ल, त्यानें तद्विपरीत स्वभावांत पट्ट होण्यास झटले पा- हिजे; तरच त्याचा हेतु पूर्ण होईल. ज्या प्राचीन साधूंनीं संसारसुखाचा त्याग व वैराग्याचा स्वीकार केला, त्यांस स्वस्त्रीभोग, स्वधनोपभोग, इत्यादि गोष्टी दोबा बाटल्या ह्मणून त्यांनी सोडिल्या असें नव्हे; तर त्यांचे सेवन करतांकरतां मनुष्यांस त्या सुखाची अनिवार्य गोडी लागून ते त्यासाठी विचाराविचार न पाहतां अनंत पातकें करण्यास प्रवर्ततात, असें त्यांस जनांमध्ये दिसून आले; तेव्हां ज्या कर्मेकरून साक्षा- तू पाप घडत नाहीं, परंतु पाप करण्याची वासना मनाचेठायीं उत्पन्न होते, असे कर्म जरी न्याय्य असले तरी त्याचा परिणाम वाईट, असा विचार मनांत आणून त्यांनी संसाराचा त्याग केला असावा असें दिसतें. ह्यांतही "कोल्याच्या शिकारीस वाघाची तयारी " दृष्टीस पडते. दुर्व्यसन सोडण्यासही एकदम प्रयत्न करूं नये. ज्याला दररोज एक शेर दारू पिण्याची खोड लागली आहे, त्यास ती टाकायांची असल्यास, त्याने दररोज संध्येची एकएक पळी ती कमी करीत जावें, ह्मणजे त्यास जड न पडतां त्याचा हेतु पूर्ण