पान:मधुमक्षिका.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५३ )


परंतु, स्वभाव पालटणें अथवा आपले स्वाधीन होणें, हैं केवळ अभ्यासानें किंवा नित्याच्या सहवासानें मात्र घडूं शकेल; दुसरा उपाय नाहीं. ह्मणूनच, “सुसंग-' ति सदा घडो", " होवो संतजना भेटी न हो अंगसंग- तुटी" असें मागणें कविजन परमेश्वरापाशीं निरंतर मागतात. मूळचा स्वभाव एकदम सोडण्याविषयीं जो कोणी यत्न करील, तो फसेल, ह्यांत संशय नाहीं. कांहीं वेळ पर्यंत त्याचा निर्धार चालेल; परंतु शेवट- पर्यंत तो टिकणार नाहीं. ह्यास्तव हा स्वभावजय हळूहळूच केला पाहिजे. त्यांत, आपण कांहींच केलें नाहीं असें आपणास प्रथमत: वाटेल खरें; तथापि, "थेंबे थेंबे तळें सांचे” ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन स्वोद्योग सतत चालवावा.मनुष्याला स्वभावतः पोहोंतां येत नसतें. ह्मणून तो प्रथमतः भोपळ्याचा आश्रय करि- तो. त्याच्या साह्याने जराजरा हात टाकतां येऊ ला गले, ह्मणजे तो त्याला टाकून देऊन स्वतःच पोहूं लागतो. सारांश जो धर्म अंगीं नाहीं, तो धर्म मनु- ब्याने दुसऱ्याच्या सहवासाने व अभ्यासानें संपादिला पाहिजे; दुसरा उपाय नाहीं. भोपळ्याच्या साह्यानें पाहतो तो पोहणारा कनिष्ठ भोपळ्यावांचून हातपाय हालवून पोहतो, तो मध्यम; आणि आसनमांडी भिड-- वून, अथवा एका हातावर तपकिरीची डबी घेऊन ती न भिजूं देतां, एक दोन माणसें कांसेस लावून जो पूर पार जातो, तो पोहणारा उत्तम जाणावा. तेव्हां जें कर्म ज्या साधनांवांचून व्हावयाचें नाहीं, तें कर्म त्यांच्या साह्याशिवाय करतां येणें, हाच पटाईतपणा होय.