पान:मधुमक्षिका.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५२ )



ठयें कनककांत।दिकांहीं जें सुख इतरजनांस प्राप्त होतें, ब. ज्यासाठी आज कोट्यवधि मानवप्राणी तळमळून राहिले आहेत, तें ह्मणजे त्यांस केवळ दु:खवत् वाटले असेल असें ह्मणतां येत नाहीं. कांकीं, त्याचे योगाने शरीरास व चित्तास फार समाधान होतें, हैं सर्वानुभवसिद्ध आहे. तेव्हां त्यांचीही चित्तवृत्ति ब्याकडे वळली असेल; परंतु, नरजन्माचें सार्थक्य जें परमार्थसाधन त्यास तें विघ्नभूत होय, असें समजून त्याचा त्यांनी त्याग केला असावा; ही गोष्ट स्वभाव स्वा- धीन असल्यावांचून घडणें नाहीं. ह्यावरून प्रयत्ने- करून स्वभाव स्वस्वाधीन ठेवितां येतो हे सिद्ध होतें. परंतु, मनुष्याचा मूळचा स्वभाव असेल, तो नाहींसा होऊन नवा होणें हैं अशक्य आहे. सक्तीने स्वभाव पालटत नाहीं. युक्तिप्रयुक्तीनेंच तो पालटला तर पालटतो. जबरदस्तीने एकाद्याची कांहीं खोड एकदम दाबिली, तर तिजवर दाब आहे तों पावेतों मात्र ती तशी दवली राहते. परंतु, कारंजाच्या नळीवर एका- एक हात ठेवून पाणी बंद करावे आणि हात काढावा झणजे जसे ते पहिल्याच्या दुप्पट उंच उडतें, त्याप्रमाणे -- दाब गेल्याबरोबर तो खोड द्विगुणित वाढते. श्रीमंत लोकांचे उधळ्ये मुलगे, व बाल्यावस्थेस्तव उत्तम कार- भाज्यांच्या धाकांत ठेविलेले राजे, हे स्वातंत्र्य पावल्या- वर कसे वागतात, हें विचारदृष्टीने पाहील त्यास आ- ह्मी सांगतों ह्याच्या खरेपणाविषयों संशय येणार नाहीं. वारंवार बोध केल्यानें व वारंवार वादप्रतिवाद केल्यानें मन कांहींसें वळते व थोडा तरी विचार करूं लागतें.