पान:मधुमक्षिका.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५१ ) हीही त्यांनी लवकरच घेतली. इ० स० १४४० त इतालीतील ओत्रांतो त्यांच्या हस्तगत झाले. सर्व युरोप ज्यास थरथरां कांपत होते, त्या सोलिमानानें इ० स० १५२२ त होदीस घेतलें; व इ० स० १५२९ त बुदा घेतलं. ह्याच वर्षी त्यांनीं विएना शहरास वेढा घातला होता. परंतु, तितक्यांत पांचवा चार्लस आल्यामुळे त्याचा बचाव झाला. पुनरपि १६६३ त ते विएना शहरावर २००००० लोकां- निशीं येऊन पडले. तेव्हांही त्यांचा फार नाश होऊन ते परत गेले, desembli ह्याप्रमाणे प्रत्येक देशाच्या इतिहासाचें दिग्प्रदर्शन करतां येईल. ह्यांचीं मूळ पुस्तकें अनेक चमत्कार समजण्यांत येऊन, चित्तास आल्हाद प्राप्त होईल. पाहिली असतां, मनुष्याचा स्वभाव. | मनुष्याचा खरा स्वभाव बहुधा गुप्त असतो. ह्म- णजे, जो वास्तविक असतो तो व बाहेर दिसतो तो, हे परस्परांपासून भिन्न असतात. मनुष्यें जनामध्यें जी कर्मे उघडपणें करण्यास अथवा करावींसें ह्मणण्यास धजत नाहींत, तीं कर्मे तीं लोकांच्या नजरे आड खुशाल करितात, हें सर्वांस ठाऊक आहे. ह्यावरून खऱ्या स्वभावाच्या गुप्तत्वाविषयीं खातरी होईल.किती- एकांचा स्वभाव कांहींसा त्यांचे स्वाधीन असतो. ह्याचीं प्रसिद्ध उदाहरणं ह्मटलीं ह्मणजे, रामदास, तुकाराम वगैरे आपले प्रख्यात साधु होत. संसाराम-