पान:मधुमक्षिका.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५०)


मून स्वतंत्र केला, तों पावेतों तो त्याच राज्याचा भाग होता. ह्या राजकुळांत पुढे गस्ताव्हस ओदालूफ आणि बारावा चार्लस हे राजे फार मोठे व प्रख्यात होऊन गेले. इ० स० १८१० त, नेपोलियनाचा • सरदार बर्नादोटी, ह्यास त्या देशाचे राजपद मिळालें. नार्वे देश इ० स० १८१४ त देन्मार्काच्या ताब्यांतून निघून स्वीदनांत सामील झाला.
 नार्वे. - झा देशामध्यें प्रथमत: फिन्स व लाप्स हे लोक राहत असत. त्यांस कांहीं काळानंतर गाय लोकांनी उत्तरेकडे घालवून दिलें. इ० स० ८७५ त हार्फझर नामक पुरुषानें ह्या देशांतील सर्व लहान लहान संस्थाने एकत्र पिलें. तें, इ० स० राज्यांत सामील होईपर्यंत करून नवें राज्य स्था- १३९७ त, देन्मार्काच्या स्वतंत्रतेने चाललें होतें; तें इ० स० १८१४ त स्वीदनच्या राज्यांत मिळाले. तथापि तेथील राज्यकारभार तेथल्या कायद्यांप्रमाणे वेगळा चालतो.
 युरोपांतील तुर्कस्थान. - तुर्क है तार्तार लोकांचे वैशज होत. इ० स० ८०० च्या सुमारास त्यांनीं आर्मिनिया देशाचा कांहीं भाग जिंकून घेतला. त्यावरून त्यास तुर्कोमानिया असें नांव पडले. नंतर त्यांनीं, सीरिया, एशियामैनार, ईजिप्त, आणि युरोप ह्यांत प्रवेश करून मुलूख मिळविला. त्यांनीं इ० स० १३६० ह्यावर्षी आद्रिआनोपल, आणि १४५३ त कान्स्तांतिनोपल हीं घेतलीं. तोच रोमन लोकांच्या पूर्वेकडील राज्याचा शेवट होय. क्रिमिया व मोरिया