पान:मधुमक्षिका.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४९ )



हालंद - रोमन लोकांच्या राज्याच्या भरभराटीचे वेळी, बतेव्ही व फिसी हे लोक ह्या देशांत राहात असत. रोमन राज्य लयास गेल्यावर गाथ वगैरे लोकां- नीं त्यावर हल्ला करून त्यामध्ये आपली लहान लहान संस्थानें स्थापिलीं तीं ख्रिस्ती शकाच्या आठव्या शत- कांत चार्लस मार्तल ह्यानें जिंकिलीं; आणि पुढे सहजच तीं शार्लमेनाच्या राज्यांत मोडूं लागलीं. दाहावे शतका- . पासून तो चवदावे शतका पावेतों ह्या देशांत अनेक वेगवेगळीं संस्थानें होतीं. पुढे लनादिकांच्या संबंधानें स्या सर्वांचें स्वामित्व बर्गंदीच्या द्यूकाकडे आले. नंतर तें आस्त्रियाच्या राज्याकडे गेले. शेवटीं तें स्पेनस प्राप्त झाले. इ० स० १५७९ त, स्पेनाचा अधिकार टाकून देऊन ती संस्थाने स्वतंत्रता पावलीं. त्यांची नांवें १ हालंद, २ फेसलंद; ३ ग्रोनिंजन; ४ ओव्हर- सेल; ५ अत्रेच; ६ ग्वेलदरलंद; आणि ७ झीलंद. बाकीचे १० प्रांत, इ० स० १७०० मध्यें, आस्त्रिया- ध्या राजकुळींतील जर्मनीमध्ये राज्य करणान्या पुरु- षांच्या ताब्यांत जात तो पर्यंत स्पेनच्या राज्याखालींच होते.
स्वीदन. ह्या देशांत प्रथमत: फिन्स व त्यांचे मागून गाय ह्यांचें प्राबल्य होतें. त्यावरूनच फिन- मार्क, फिनलांद, गाथनबर्ग, हीं नांवें पडली असावीं. देन्मार्कामध्ये मार्गरेत राणी राज्य करीत असतां, स्वादन व नार्वे हे देश, इ० स० १३९७ त तिचे राज्यांत सामील झाले. गस्ताव्हस ह्यानें, इ० स० १५२३ त स्वीदन देश देन्मार्काच्या दास्यांतून सोड-