पान:मधुमक्षिका.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४८ )


पहिला फ्रान्सीस असें नांव देऊन सिंहासनावर बसविलें. पुढें, दुसरा फ्रान्सीस गादीवर असतां, नेपो- लियनानें त्याचें पुष्कळ राज्य जिंकून घेऊन, त्याज- कडून 'जर्मनीचा बादशाह हा अधिकार काढून, त्याबद्द - ल, नुसता आस्त्रियाचा राजा इतकामात्र अधिकार ठेविला.
 स्पेन. - ह्या देशामध्यें प्राचीन काळीं ऐबीरियन व दुसरे कित्येक एशिया खंडांतले लोक राहात असत. त्यांच्या जुन्या जाती व भाषा ह्यांचा बराच अंश अद्या- पि बास्कनामक प्रांतामध्ये दिसून येतो. फार प्राचीन काळीं फिनिशियन लोकांनीं त्या देशाचा बहुतेक भाग आपलेकडे जिंकून घेतला होता. त्यांस रोमन लोकांनीं तेथून घालवून दिलें; आणि स्पेन देश आपले राज्यास जोडला. रोमचें राज्य नाशाप्रत पावल्यावर ह्या देशा- मध्ये व्हिदल, सुव्ही, आणि आलन्स ह्या लोकांचा अंमल झाला. नंतर इ० स० ४७७ त पश्चिमेकडील गाथ लोकांनी त्या सर्वांस जिंकून एक नवेंच राज्य स्थापिलें तें, इ० स० ७१३ ह्या वर्षी सारासन ह्मणजे मूर लोकांनीं जिंकून आपले स्वाधीन करून घेतलें. कांहीं डोंगरी प्रांत खेरीज करून त्यांनी सर्व देशाची धूळधाण केली; आणि सुमारे ८०० वर्षे पर्यंत ते ह्या देशाच्या उत्कृष्ट भागों आपला अंमल चालवून होते, असें इतिहासावरून कळते. त्यांस स्पेनचा प्रख्यात राजा फेर्दिनांद व विख्यात राणी इसाबेला ह्यांनीं, इ० स० १४९२ च्या सुमारास देशाबाहेर काढून लावून सर्व राज्य आपले हातीं घेतलें.