पान:मधुमक्षिका.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७


स जर्मनीचा व इतालीचा वादशाह ह्मणविलें. आत्रि या देशांतील राजकुळाचा मूळपुरुष रोदाल्क हा इ० स० १२७३ त सिंहासनावर बसला. त्यानंतरचा बादशाह माक्तिमिलियन ह्यानें, बर्गदीचा द्यूक चाल- स ह्याची वारसदारीण मेरी हिशी लग्न केलें; तेणें करू- न नेदर्लंद देश आस्त्रियाच्या राज्याखालों सहजच आला.(इ०स० १४७७). आणि त्याचाच पुत्र फिलिप ह्यानें, इ० स० १४९६ त, स्पेनचा राजा फेर्दिनांद आणि राणी इस्साबेला, ह्यांची कन्या हेन, दिशीं लग्न केले.....तेव्हां त्याही देशावर आस्त्रिया देशाचा हक्क पोहोचूं लागला. माक्ति मिलियनाचा नातू पांचवा चार्लस, इ० १५१६ त स्पेनच्या गादीवर बसला; आणि पुढे तीन वर्षांनीं भस्त्रि या देशाचें स्वामित्व पावला. त्याने राज्यत्याग केल्यावर स्पेन व नेदर्लंद हे देश, त्याचा पुत्र दुसरा फिलिप ह्यास मिळाले; व आस्त्रिया, बोहिमिया, आणि हंगारी है देश, त्याचा भाऊ फेर्दिनांद ह्याजकडे राहिले. हाच पुढें जर्मनीचा बादशाहा झाला. इ० स० १७४० त, ह्या राजकुळांतला साहावा चार्लस मरण पावल्या मुळे • गादीला वारसदार पुरुष नाहींसा झाला. तेव्हां त्याची मुलगी मेरिया थेरीसा, ही सर्व राज्याची मालकीण झाली. तें राजपद तिला मिळावें, किंवा न मिळावें ह्या वादावरून युरोपांत मोठी लढाई सुरू झाली. तींत बहुत राजांचें अंग होतें. शेवटी, इ० स० १७४८ त, एशला चापे- ल येथें तह ठरून तिचा शेवट झाला. मेरिया हिची मालकी सर्वांनीं कबूल केली; व तिच्या भ्रतारास