पान:मधुमक्षिका.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४६ )


कांचीं दुसरीं शहरें घेऊन, देशाचे स्वातंत्र्य पुनः स्था- पिलें. इव्हान मरण पावल्यावर, त्याचा भाऊ पीतर धित हा इ० स० १६९६ व गादीवर बसला. हा राजा मोठा पराक्रमी होता. त्यानें आपला देश सुधारून स्वकर्तृत्वानें उत्तम दशेस आणिला. त्याचे पूर्वी रुशि यन लोक केवळ रानटी होते. पीतराने स्वदेशाहि- वार्थ जे श्रम केले, ते पुस्तकांत पुष्कळ जागीं वर्णिले आहेत.
 प्रुशिआ. - ह्या देशांत प्राचीन काळीं गाथ लोकांचे मागून पुझि लोक राहिले होते, त्यांवरून हें नांव पडलें. त्या लोकांस त्यूतोनिक सरदारांनी जिंकून ३० स० १२२७ त तो देश आपणांकडे घेतला. त्यांचे हातून तो देश जाऊन पुढे पोलंद देशच्या राजास मिळाला. तो इ० स० १५५६ पावेतों, ह्मणजे फेदरिक विलि- यम, हा तो देश त्या पारतंत्र्यापासून सोडवी पावेतों, त्या- च राज्याखालों होता. नंतर त्याचा पुत्र फेदरिक धियेत इ० स० १७४० त गादीवर बसला. त्यानें आपल्या बुद्धिचातुर्ये करून व निरंतर परिश्रम घेऊन प्रशिआ देश उत्तमावस्थेत आणला.
 भास्त्रिया. - पश्चिम युरोपाचा राजा शार्लमेन, ह्या- च्या राज्याच्या पूर्वेस हा देश आहे, हाणून त्यास अत्रि- या है नांव पडलें. ह्याचा अर्थ पूर्वेकडील असा होतो. इ० स० ९१२ मध्यें, फ्रांकोनिया येथील नवाब कानरा- द, ह्यास जर्मनीचें आधिपत्य मिळालें. तोपर्यंत तो मुलूख फ्रेंचांकडे होता. पुढे ओथो धित्रेत ह्यानें बोहिमिया व इताली जिंकून, इ० स० ९६२ त आपणा-