पान:मधुमक्षिका.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४५ )



ह्यामुळे मोठें बंड उत्पन्न होऊन, इ० स० १७९३ त तो राजा प्राणास मुकला. नंतर फ्रान्सांत प्रजासत्ताक राज्य स्थापित झालें. तेंही थोडयाच काळांत मोड़न प्रख्यात युद्धधुरंधर नेपोलियन बोनापार्ट हा, फर्स्ट कौन्सिल ही पदवी घेऊन इ० स०१८०४ त, सर्व देशाचा राजा झाला. तथापि इ० स० १८१५ मध्ये, वात येथें तो पूर्ण पराभव पावून इंग्लिशांचे हातीं लागला. त्याला त्यांनी कैद करून एका बेटांत ठेविलें. आणि फ्रान्सच्या मूळच्या राजकुळास त्याचें पद प्राप्त झालें.ह्या नंतर घडलेल्या गोष्टी प्रसिद्धच आहेत.
 रुशिया. - ह्याचें प्राचीन नांव सामशिया. ख्रिस्ती शकाच्या नववे शतकांत साल्व्हानिक जातीचे रोसि ह्मणून लोक होते; त्यांवरून रुशिया हें नांव पडलें. ह्या देशांत यथानुक्रमें सीथियन, गाथ, व्हांदल, हन्स, इत्यादि रानटी लोकांचें प्राबल्य होतें. ते रोमन लोकांच्या राज्यांत स्वाऱ्या करीत असत. इ० स० टी ८६२ त, रुसिक नामक एका स्कांदिनेवियनाने त्या देशांतील लहान लहान सर्व नाईक एकत्र करून मोठें राज्य स्थापिलें. व्हला डामर नामक रा-जानें, इ० स० ९७६ त, ग्रीकचर्च नामक धर्मपंथ स्वीकारिला; व तो आपले प्रजेस स्वीकारायास लाविलें. ते लोक पूर्वी मूर्तिपूजक होते. मोंगलांचा खान बातो, ह्यानें इ० स० १२३७ त, हा देश काबीज करून घे. तला. तो, त्याचे व त्याचे वंशजांचे ताब्यांत मिळून एकंदर अदमासें २५० वर्षे पर्यंत राहिला. परंतु, इव्हान बासिलो व्हिच ह्यानें आस्त्राखान व तार्तार लो-