पान:मधुमक्षिका.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४४ )



संभाषणाने व आंगच्या विजातीय शौर्याच्या योगानें आपल्या लोकांस वीरश्री उत्पन्न करून त्यांच्या हातून भोर्लीन्सच्या वेढ्यांत इंग्लिशांचा सर्वथा पराजय करून टाकिला. व दुसरे कित्येक प्रसंगी तिनें त्यांजवर जय मिळविले. तेणें करून त्यांस तो देश सोडून स्वदेशी परत जाणे भाग पडलें; इ० स० १४५० त हैं घडलें.- बुर्बोन घराण्यांतला पहिला राजा व नव्हारीचा अधिपति चवथा चार्लस हा इ० स० १४९७त फ्रान्सच्या गादीवर बसला. हा राजा चांगला होता. क्याथलिक पथाचा अधिकारी व अभिमानी हा असल्यामुळे, प्रातेस्तंत मता- भिमानी लोकांकडून त्यास बरेच धक्के सोसावे लागले. व त्याचा शेवटही त्यांतच झाला. एके दिवशी पारीस शहरांतून तो गाडीत बसून जात असतां राव्हेलाक नामक एका मनुष्यानें त्याला ठार मारिलें. हें इ० स० १६१० त घडलें. तेव्हां त्याच्या वयास ५२ वें व कारकीर्दीस २२ वें वर्ष होते. चवदावा लुई राजा इ०स० १६४३ त पांच वर्षांचा असतां गादीवर बसला. तो इ० स० १७१५ त ७७ वर्षांचा होऊन मरण पाव- ला. त्याच्या कारकीर्दीत फ्रान्स देशांत कला कौशल्याची व ज्ञानाची पुष्कळ वृद्धेि झाली. व तो देश युरोप खंडांत त्या काळी मोठ्या योग्यतेस चढला. १६ वा लुई हा राजा · गादीवर असतां, अमेरिकनांचा पक्ष फ्रेंचांनीं धरिल्यामुळे त्यांचें व इंग्लिश लोकांचें युद्ध लागले. त्याकडे पुष्कळ पैसा खर्चून लुई राजाचें भांडार रिकामें पडण्याचा प्रसंग आला. तेव्हां पैसा जमविण्यासाठीं त्यानें प्रजेवर नवा कर बसविला. तो त्याचे पार्लमेंतास मान्य नव्हता,