पान:मधुमक्षिका.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४३ )


देशांतील लोक नार्मन, हे, इ० स० ९१२ त फ्रान्सावर सारीचा झेंडा उभारून आले. त्यांनी त्यांतील न्यूस्त्रि- या प्रांत जिंकून घेऊन तेथें आपली बसाहात केली. त्याच प्रदेशाला कांहीं कालानंतर नामंदी हें नांव प्राप्त झालें. इ. स. १०६६ त, नार्मन लोकांनी इंग्लंद देश जिंकला, असें इतिहासांत आढळते, तेथील लोक ह्याच लोकांचे वंशज होत. - ह्यूक्यापेत ह्मणून कोणी एक मनुष्य पारिस येथे मोठ्या अधिकारावर होता. त्यानें गादीवरच्या राजकुळाचा समूळ नाश करून राज्यपद बळकाविलें. ही गोष्ट इ. स. ९८७ व घडली. फ्रान्सच्या इतिहासांतील प्रख्यात गोष्टी येणें प्रमाणे:- ह्या देशास इंग्लंदचा राजा तिसरा एदवर्द व पांचवा हेनरी, ह्या दोन राजांपाशीं लढाया कराव्या लागल्या; व त्यांपासून त्याचें फार नुकसान झालें. एद. वर्दाबरोबरच्या लढाईत तर फ्रेंच राजा जान ह्यास इंग्लिशांनी कैद केलें. आणि हेनरी बरोबरच्या युद्धाचा शेवट असा झाला की, फ्रान्स देशच्या राजपदावर त्याचा वारसा आहे असें ठरलें; ही गोष्ट इ० स० १४२० व घडली; आणि त्याचे मागून साहावा हेनरी आपणास फ्रान्सचा बादशाह ह्मणवूं लागला. - जोन अफू आर्क नामें फ्रेंच स्त्री हिनें, मला स्वदेशहित करण्याविषयीं ईश्वरी प्रेरणा झाली आहे, सबब मला सेंतपालच्या देव- टांतली पवित्र तरवार व सेना द्यावी, मी इंग्लिश सैन्या- चामोड करून टाकून जय मिळवितें, असें तेथील तेव्हांचा राजा सातवा चार्लस ह्यास सांगितले. त्याप्रमाणें तिची सिद्धता करून दिल्पावर तिनें उत्साहजनक