पान:मधुमक्षिका.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४२ )


देणार आहों, त्या इतिहासांवर अनेक मोठमोठे ग्रंथ झा- लेले आहेत. ते पाहण्याविषयों इच्छा होण्यास कांहीं अनुगम असावा. हें मनांत आणून हा लेख संक्षेपानें लिहिला आहे.
 फ्रान्स. - ज्या प्राचीन केलूत लोकांस रोमन लोक गाल असें ह्मणत, ते लोक ह्या देशचे मूळचे राहणारे होत. रोमचा बादशाह जूलियस सीझर, ह्यानें स्त्रि स्ती सनापूर्वी सुमारे ६० वर्षे ह्या देशावर स्वारी करून तो जिंकिला. तेव्हांपासून तो फ्रांकांचा राजा क्लोव्हिस, हा तो देश जिंकून घेईपर्यंत त्याजवर रोमन लोकच राज्य करीत होते. क्लोव्हिस हा प्रथमत: ख्रिस्ती नव्ह ता. परंतु त्याची बायको क्तोतिलदा ही त्या धर्माची होती; एके संकटसमयीं त्यानें खिस्ती लोकांचे देवास नवस केला व त्याप्रमाणें दैववशात् तो त्या संकटांतून पा. र पडला. तेव्हां त्याला वाटलें कीं, तो देव (ख्रिस्त ) पावला. त्यावरून त्यानें स्वतः व त्याचे अनुयायी सु- मारें ३००० लोक ह्यांनीं ख्रिस्ती धर्म स्वीकारिला. हाच फान्साचा पहिला ख्रिस्ती राजा होय. येथील लोक आपणांस फ्रांक ह्मणवीत. त्यावरून ह्या देशास फ्रान्स हें नांव पडलें. हा राजा इ० स० ५११ ह्या वर्षी मरण पावला. त्यानेंच पारिस हें राजधानीवें शहर स्थापिलें. इ० स० ८०० ह्या वर्षों शार्लमेन ह्मणजे धोरला चार्लस हा सिंहासनारूढ झाला. त्यानें स्पेन, जर्मनी, व इतालीचा बहुतेक भाग हे जिंकून आपले राज्यांत सामील केले होते. परंतु, तो मेल्यानंतर जर्मनीचे राज्य फ्रान्सापासून तुटून राहिलें, पुढे नार्वे