पान:मधुमक्षिका.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३८ )


निघाला, तो बेधडक बहिरामाच्या तंबूंत शिरला. त्या- मुळे कितीएक तंबू पडले; व बहिरामही त्या भयंकर संकटांत घाबरून गेला. पण त्यास कांहीं इजा झाली नाहीं. तथापि त्या हत्तीवरच्या महाताचा त्यानें तत्का- ळ प्राण घेतला. व हें सर्व कपट मला ठार मार- ण्यासाठीं बादशाहानें रचिलें, असें त्याच्या मनांत पक्के ठसलें. तेव्हां पासून तो अकबराशीं फार सावधगिरी- बागू लागला. बादशाहाच्या मनांतही कपट भालें; व त्यानें बहिरामास काढून टाकून राज्यकारभार स्वतः चालविण्याचा निश्चय केला. इ० स० १५६० च्या मार्च महिन्यांत त्यानें आपला हेतु उघडपणें शेव- टास नेला. तेव्हां सहजच बहिराम बिथरला. त्यानें लागलेच बंड केले; व बादशाहास पकडण्याचा घाट घातला. सप्तंबर महिन्यांत अकबरानें स्वतः त्याजवर खारी केली. बहिराम हटला, पराभव पावला, आणि बादशाहास शरण आला. अकबरानें सरदार लोक सामोरे पाठवून त्याचा सत्कारपूर्वक स्वीकार केला. तो, पुढे आल्या बरोबर बादशाहाच्या पायां पडून स्फुंदून स्फुं दून रडला. बादशाहानें त्यास उठवून आपले उजवे बाजूस बसविलें, नवे पोशाख दिले, आणि दरबारामध्यें Ac मोठ्या इतमामानें राहावें, अथवा खर्चात घेऊन पाहिजे असल्यास मक्केच्या यात्रेस जावें, असें सांगितलें. ह्या गोष्टीवरून, अकवर किती क्षमाशील, किती कृतज्ञ, आणि किती शाहाणा होता ते पाहा ! ज्यानें त्यास पक- डून कदाचित्सतें मारलेंही अत्यास त्यानें त्याच्या अपराधांची माफी केली. बहिराम आपले बापास फार