पान:मधुमक्षिका.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३९ )


उपयोगों पडत असे, तर त्याचे चांगले चालविणें हें आपले कर्तव्य आहे, असें समजून तो त्यास पुष्कळ द्रव्य देण्यास तयार झाला. परंतु, हा राज्यकारभा- रांत आला असतां आपलें कांहीं चालू देणार नाहीं, हैं पक्कं समजून, त्यानें त्याला दुसऱ्या गोष्टींनी संतुष्ट करून, मोठ्या चतुराईनें दरबारांतून काढून यात्रेस लाविलें.
 सर्व प्रजेची आपणावर चांगली निष्ठा असणें, हीच आपल्या राज्याची मजबुदी आहे, असें अकबर जाणत होता. ह्मणून त्यानें हिंदू वगैरे स्वजातिवाह्य लोकांस- ही मोठमोठया हुद्याचीं कामें दिलीं. ही तरी मोठी शाहाणपणाची गोष्ट होय.
 अकबर गादीवर बसल्यावर देखील, शीरशाहानें आपलें राज्य पुनः घेण्यासाठीं, इ. स. १५६० त, मोठें सैन्य पाठविलें होतें. त्याचा मोड, बादशाहाचा सरदार खानझमान ह्यानें केला, आणि पुष्कळ लूट मिळविली. तिचा वांटा तो अकबरास दईना; व त्याला पोर ह्मणून 'तुच्छ' लागला. तेव्हां हा कदाचित् वंडाई करील, असें जाणून बादशाह, त्याचे घरीं गेला; तेर्णेकरून तो कांहींसा मार्गावर आला. " अ- कबराच्या निरभिमानीपणाची व प्रसंगानुसार वागण्या- च्या शाहाणपणाची ही एक गोष्ट आहे.
 तसाच माळव्यामध्यें बाजबहादूर ह्याचा पराभव भ दमखान ह्यानें केला. तेणेंकरून तो पराकाष्ठेचा ग विंष्ट होऊन अकबराशीं वांकडा वागूं लागला. त्याच्या छावणीवर अकस्मात हल्ला करून बादशाहानें त्यास जे-