पान:मधुमक्षिका.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३७ )


बहिरामखान नामक हुमायुनाचे वेळचा प्रख्यात व बलिष्ठ सरदार होता, तो पाहात असे.हा सरदार जसा मोठा शूर होता तसा महत्वाकांक्षीही होता. अकबर सिंहासनारूढ झाला त्याच वर्षी हेमू नामा एक मोठा अफगाण सरदार, मोंगल लोकांस हाकून देण्याच्या उद्देशानें सैन्य घेऊन आला. त्यास बाणप्रहाराने नि- श्रेष्ट करून बहिरामानें अकबराच्या डेण्यांत आणिलें; आणि आपल्या नव्या अल्पवयी बादशाहास सांगितलें कों, " महाराज, ह्या आपल्या शत्रूचा आपण स्वहस्तें तरवारीनें वध करून टाकावा." हें ऐकिल्यावर जरासा विचार करून अकबरानें उत्तर दिलें, “घायाळ झाले- ल्या शत्रूवर मी हात टाकणार नाहीं." तेव्हां तें बहि- रामास अमळसें वाईट लागले. त्यानें तत्काळ तरवार घेऊन हेमूचा वध केला. ही गोष्ट ता० ५ नोवेंबर रोजों घडली. हिजवरून, अकबर केवळ सवाते.. रा वर्षांचा असतांही, त्यास शूराचें खरें यश कोणतें हैं चांगलं कळत होतें असे दिसते.
 बहिराम हा स्वभावानें मानी, कठोर, तुसडा, दांडगा, आणि आपले पुढें कोणाचीही मात्रा न चाल देणारा असा होता. तेणेंकरून लोक त्रासले होते व तो अकबरास अगदीं बाळ समजून त्यास न पुस्ता यथेच्छ जुलूम व माराहाणी करीत असे. दिल्लींचा जुना सुभेदार तारदीवेग, हुमायुनाचा मित्र, ह्याचा त्यानें प्राण घेतला. पुढे एके दिवशीं अकवर हत्तीं- च्या झोंब्या लावून गंमत पाहात बसला असतां, एक इत्ती, दुसऱ्या हत्तीस भिऊन जो एकसारखा पळत