पान:मधुमक्षिका.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३६ )

असें झटले पाहिजे.अकबराचें चरित्र फार मनोरं जक आहे. ह्मणून तें संक्षेपत: लिहून वाचकांस सादर करितों.
 अकबराचा बाप हुमायून बादशाह, ह्यास शीर शाहानें पदच्युत करून पळायास लाविलें. तेव्हां तो राज्याची आशा सोडून, सांपडलें तितकें द्रव्य बरोबर कुटुंबासहवर्तमान अमरकोट घेऊन, येथें आला. तेथील राजा राणाप्रसाद ह्याने त्याचा अत्यादरपूर्वक स्वीकार केला; आणि सिंध देशांत राज्य मिळविण्याचे कामीं त्यास मदत देण्याचें पथकरिलें.त्याप्रमाणें तो तिकडे निघून गेल्यावर, दुसरे दिवशीं, ह्मणजे ता. १४ अक्तोबर सन १५४२ रोजों, बादशाहाची राणी पुत्र प्रसवली. ही पुत्रजन्माची सुवार्ता हुमायुनास स्वारींत समजली. मुसलमान लोकांत अशी चाल आहे कीं, अशा प्रकारची आनंदकारक बातमी समजली ह्मणजे तेव्हां जे कोणी इष्टमित्र जवळ असतील, त्यांस स्वसाम नुरूप नजराणे द्यावे. ह्यावेळी हुमायुनापाशीं एक कस्तूरीची कुपी खेरीज करून दुसरें कांहीएक नव्हतें. ह्मणून ती कुपी फोडून त्यानें तींतील कस्तूरी तेथच्या मंडळीस वांटली; आणि असे झटलें कीं, ह्या कस्तूरीच्या सुवासाप्रमाणे माझ्या पुत्राची कीर्ति ह्या जगांत पसरो. हे त्याचें ह्मणणे, परमेश्वर कृपेकरून, सर्वथैव खरें झालें.
 हुमायून मृत्यु पावल्यानंतर, इ० स० १५५६ ह्या वर्षी अकबर त्याचे गादीवर बसला. तेव्हां तो तेरा वर्षे चार महिने इतक्या वयाचा होता.नव्या बादशा- हाचे वय लहान, ह्मणून सगळ्या राज्याचा कारभार;