पान:मधुमक्षिका.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३५ )


कीं, आपली खर्चाची खातों, जीं विनाकारण वाढली असतील, तीं दमादमानें कमी केली पाहिजेत. ह्मणजे त्याच्या योगानें आपला व्यर्थ खर्च कमी होईल, कर्ज फिटेल, आणि कर्ज न होऊं देण्याची मुख्य युक्ति जो बाताबेता- नें खर्च करण्याची सवय, ती अंगीं जडेल. ज्याला ऋण फेडावयाचें आहे, त्यानें आपले बारीकसारीक दे- खील खर्च, होतील तितके कमी करावे. घरांतील ह लके सलके खर्च कमी करून अडचण भोगणे पुरवलें, परंतु तसे न केल्याने लोकांमध्ये दैन्य भोगणें हें फार अपमानास्पद आहे. एकादा नित्यखर्च सुरू करते- समयीं, हा खर्च आपणाच्यानें अखेरपर्यंत चालवेल किंवा नाहीं, ह्याचा आधीं विचार करावा. तसाच प्रसंग. विशेषीं खर्च करणें तोही दूरवर दृष्टि देऊन झेंपण्यासा- रखा असल्यास करावा; नाहीं तर विपत्ति आणि अप्रतिष्ठा हीं जिणें नकोसे करतात.


अकबर.

 ह्या बादशाहाचें नांव, त्याच्या शाहाणपणावरून अथवा मोहरेवरून प्रसिद्ध आहे. हिंदुस्थानाचें पालन करण्याचा अधिकार, यावत्कालपर्यंत, जगदीशसंकेतानु- रूप ज्या अनेक प्रभूंच्या हातीं गेला, त्यांमध्यें ह्या प्रभूची उपमा ह्यालाच शोभते. विद्या, अनुभव, इत्यादि गो- ष्टींचा फारसा संस्कार नसतां, ह्या पुरुषानें पंचविशीचे आंत, प्रचंड राजभार स्वशिरी घरून, तो, नव्याणव वर्षाच्या आनुभविक आणि विद्वान राजाप्रमाणे वाहून ला; ह्यावरून ह्याची बुद्धि खचीत अलौकिक होती,