पान:मधुमक्षिका.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३४ )


करावें कीं, एकादे दिवशीं एक मधलेंच प्रकरण काढून तपासावें; ह्मणजे, नौकर लोक कांहीं तरी भीत जातील. मनुष्य कितीही संपन्न असला, तरी त्याला सर्वच प्र कारच्या खर्चात उधळेपणा करणें उपयोगीं नाहीं. जर वस्त्राचा षोक त्याला फार असला, तर त्यानें खाण्या- पिण्याच्या खर्चात हात आंखडावा; जर घोडयाचा षो- क असला, तर इतर सामानाच्या कामीं खर्च बेताना- तानें. करावा; अशा सवडीच्या गोष्टी अनेक काढवां येतील. तथापि एकंदरींत हैं लक्षांत ठेवावें कीं, जो सर्वच प्रकारचा खर्च उधळेपणानें करितो, तो कितीही श्रीमान असला तरी, मिकेस लागल्यावांचून राहणार नाहीं. कोणा एकाद्याला कर्ज झाले असले तर तें कर्ज फेडण्याविषयीं त्यानें उताविळपणा करूं नये. आ पलें सामानसुमान विकून टाकण्याची जलदी मांडिली तर, त्यांत आपले फार नुकसान होतें. कां कीं, आपण गरजू असल्यामुळे, आपणास मालाची योग्य किंमत मि- ळत नाहीं. ह्यास्तव, लोक गरजू होत तो पावेतों थोडा दम धरावा, ह्मणजे त्यांत हित होतें. हळूहळू कर्ज फेडण्यांत आणखी एक नफा आहे, तो असा.लवकर एकदम कर्ज फेडून मनुष्य मोकळा झाला तरी, कर्जा- चें कारण जी ढिलाईनें खर्च करण्याची त्याची बहुत दिवस जडलेली सवय, ती, त्या त्वेषानें, कर्जाबरोबर जाते, असें नाहीं. त्या त्वेषाबरोबर तो कांहीं दिवस कमी झाली तरी तो त्वेष गेला, ह्मणजे पुनः त्याच्या बुद्धीवर, ती सवय आपला पगडा चालवून त्यास संक- टांत प्राडिते. हें संकट टाळण्याचा उपाय हाच आहे