पान:मधुमक्षिका.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३३ )


लबाडी करण्यास सांपडूं नये, असा बेत ठेवावा. आ. णि प्राप्तीपेक्षां खर्च कमी होत आहे की नाहीं, हें हर- हमेष पाहात जावें. मध्यम रीतीनें खाऊन पिऊन स्वस्थ राहावें, असें ज्याचे मनांत असेल, त्यांनें आपल्या प्राप्तीच्या अर्धाइतका खर्च ठेवावा. श्रीमंत होण्याची इच्छा ज्यास असेल, त्यानें प्राप्तीचा तिसरा वांटा खर्चा कडे लावावा, व दोन वांटे शिलकेस राखावे.मनुष्य कितीही मोठा असला, तरी, आपले जमाखर्च तपास- णें हें काम त्याला हलकें वाटू नये. आपला खर्च प्राप्तीपेक्षां पुष्कळ फाजील होतो, व आपणास कर्ज हो- त चालले आहे, असें ठोकताळ्यानें माहीत असतांधी, कर्जाची रकम पाहिल्याबरोबर छाती दडपेल, ह्या भी- तीनें, परंतु आळसाचा बाहाणा करून, कितीएक पुरुष आपले हिशेव पाहात नाहीत. परंतु, जखम पडली आहे, ती पाहून, तिला मलमपट्टी लाविल्यावांचून ती भरावयाची नाहीं, हें त्यांच्या लक्षांत कसें येत नाहीं नकळे. ज्या मोठ्या लोकांस आपले हिशेब तपास- ण्याची कटकट वाटत असेल, त्यांनी असे तरी करावें कीं, नौकर लोक चांगले विश्वासू आणि खातरीचे ठेवावे; आणि त्यांच्या कामांच्या बदल्या वारंवार कराव्या; तेणें करून लबाडी होण्यास फार थोडी जागा राहाते. कां कीं, कोणालाही एकादें काम नवीन मिळाले झणजे तो तें, कांहीं दिवस पर्यंत तरी, भिऊन इमानानें करीत असतो; कारण, त्यांतील कोणती लबाडी उघाडीस येईल व को- णती येणार नाहीं, हें त्याला अवगत नसतें. जे कोणी आप ले हिशेब कधींच पाहात नाहीत, त्यांनी आणखी असें तरी