पान:मधुमक्षिका.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२ )


केशरी बर्फीपेक्षाही अधिक गोड लागली. अस्तु. अ. गढ़ीं बरोबर न्याय करण्यास पूर्वी बोललो ते गुण पूर्ण- पणे प्राप्त झाले पाहिजेत. तसे गुण ह्या मृत्युलोकों मानवांचें ठायों असणे अशक्य आहे. ते माझ्या कृपा- ळू न्यायी देवाचे ठायीं मात्र पूर्ण वेंकरून वास करीत आहेत, आणि सर्वांचा वाजवी न्याय करणारा तोच आ- हे. - आपण मनुष्यांनीं अपराध संबंधे पुरावा होईल तित- का मिळवून, केवळ त्याच्या आधारानें, ह्मणजे, द्रव्यलो- भ, ममता, ह्यांचें कांहीं चालूं न देतां, शास्त्राप्रमाणें दे- वाला भिऊन न्याय करावा, हेंच आपले कर्तव्य आहे." येणेंप्रमाणें बादशाहाचें भाषण ऐकून सर्व लोक फार खुष व आभारी झाले. नंतर ते तेथून उठून आपापले घरी गेले.


द्रव्याचा व्यय.

 सत्कृत्यामध्ये व सन्मानार्थ पैसा खर्चणें, हा द्रव्याचा सद्यय होय. प्रसंगविशेषीं खर्च करणें तो त्या प्रसं- गाची योग्यता व आपली प्राप्ति ह्यांच्या तारतम्यानें केला पाहिजे. नित्य खर्च नेहमींच्या प्राप्तीच्या मानानेंच केला पाहिजे. आदा पाहून खर्च करावा, अशी जो उपदे- शपर उत्कृष्ट ह्मण आहे, ती लग्न समारंभाच्या वगैरे दि वसांस लावावयाची नाहीं असे कोणी समजतात, ही त्यां- ची चूक आहे. एकंदर प्राप्तीची सरासरी करून पा- इतां सर्वकाळी व सर्व प्रसंगी ह्या ह्मणीचा अर्थ खरा आहे. ह्मणून आपला खर्च प्राप्तीपेक्षां कदापि जास्त होऊं देऊं नये, आपल्या ताब्यांतील नौकरांस पैशाची