पान:मधुमक्षिका.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३१)

ऊक असतें, व अमक्या खटल्याची चौकशी माझे हा तून व्हावयाची, हें न्यायाधीशास माहीत असतें, हें ज्ञान जर उभयपक्षींही नसेल, तर पूर्वोक्त अन्याय व्हावयाचा नाहीं. ह्मणजे न्यायाधीश आणि आरोपित जन, जर एकमेकांस अश्रुत असले, तर त्यांच्या मनांत लांच, लोभ, प्रीति, ममता, दया, ह्यांस मार्ग मिळत नाहीं; आणि ह्यांस मार्ग मिळाला नाहीं, झणजे केवळ पुराव्यावरहुकूम न्याय होण्याला भटकाव होत नाहीं. प्रेत पाहिल्याबरोबर माझे डोळे पाण्यानें भरले, व मी परमेश्वराची प्रार्थना केली, ह्याचें कारण असें कीं, जगत्कर्त्या न्यायी प्रभूनें, माझे हातून योग्य न्याय करवून, माझ्या प्रिय पुत्राचा वध मजकडून घडविला नाहीं, असें मनांत येऊन माझा कंठ भक्तिरसानें दाटून गेला, तेव्हां सहजच माझे नेत्रांतून अश्रु वाहूं लागले, व माझ्या दयाळू मायबापा परमेशाची प्रार्थना करण्या- विषयों मला बुद्धि झाली. तर ह्यावरून जगत्रा- त्यांचे कौतुक किती अगाध आहे बरें ! असो. आतां भाकर खाण्याचे कारण कायतें सांगतों ऐक; अरे, तूं म ला हें वर्तमान सकाळी सांगितलें, तेव्हांच माझे मनांत आलें कीं, हें कर्म शाहाजाद्याचें असावें, ह्मणून त्याचें पारिपत्य करण्यांत माझे हातून पुत्रवध झाल्यावांचून रा. होत नाहीं. ह्या काळजीनें तेव्हां पासून ह्या वेळेपर्यंत मला अन्नपाणी कांहींच गेले नाहीं, तेणेंकरून मला पराकाष्ठेची भूक लागली होती, ह्मणून मी ती भाकर खाल्ली. ती नुसती भाकर होती, तरी हा आनंदाचा प्रसंग देवानें मला दाखविला, त्याच्या योगानें तो मला