पान:मधुमक्षिका.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३०)



राध आह्मांस समक्ष पाहाण्यास सांपडत नाहीत, त्यांच्या "चौकशीमध्ये सर्वसातिवाचा जो अंश आह्मांस अवश्य पाहिजे, तो आह्मीं साक्षीदार मनुष्ये व मुद्याचा माल, ह्यांच्या द्वारे संपादवेल तितका संपादितों:आजच्या चौकशींत तशा प्रकाराचें मुळींच कारण पडलें नाहीं; को की, गुन्हेगार मुद्यासुद्धां आह्मीं खुद पकडला. दुसरा गुण निःपक्षपातीपणा; तो साधण्यासाठी मी दिवे मशाला विझविल्या; ह्यांतलें तात्पर्य असें. माझा वडील शाहजहा तरुण असून कांहीं बाहेरख्याली आहे. तो तर हा अपराधी नसेलना, अशी मला शंका प्राप्त झाली. आणखी असा विचार मनांत आला कीं, जर दर्दैवेंकरून तोच हा असला आणि त्याचें रूप पाहिले अथवा शब्द ऐकला, तर पुत्रवात्स- ल्प कदाचित माझ्या न्यायबुद्धीत खाऊन टाकील, आ- णि तेणेंकरून तो महान् अपराधी असतांही निर्वाध सुटून जाईल, हें बरोबर नाहीं. आणि हा अपराधी माझा पुत्र तर नसेलना अशी जशी मला भीति होती, तशी कदाचित् तो त्याहून निराळा असेल, अशी आशाही होती. ह्मणून, तो कोण हें त्यास शिक्षा करण्यापूर्वी आपणाला समजूं नये, ह्या हेतूनें मनुष्य ओळखण्याचे जे दोन तथ्य मार्ग, सरूपावलोकन व शब्दश्रवण ते नाहींतसे करण्याकरितां मी मशाली विझवविल्या व मो- ठा जयशब्द करविला. ह्या जगामध्ये उघड अपरा घी दंड न पावतां सुटून जातात, व उघड निरपराधी दंड भोगितात, ह्याचें एक मुख्य कारण असे आहे की, माझी चौकशी करणारा कोण, हें अपराध्यास ठा-