पान:मधुमक्षिका.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९ )


तेंच राज्य सर्वोत्तम होय;' हें उत्तर बिनमोल आहे. आणि ह्य। गुणावरूनच माझे राज्यास लोकांनीं वाखाणावें, असें मी. इच्छितों. मी तुझी दाद घेऊन ह्या दुष्टास मारिलें, ह्यांत मी मोठा पुरुषार्थ केला असें नाहीं. मी असें करावें असा माझा राजधर्मच आहे.तुझी दाद घेतली नसती, आणि हा जुलूम असाच चालूं दिला असता, तर मात्र मी दोषास पात्र झाला असतो. तर त्याचा मी बंदोबस्त केला हें मोठें पुण्यकर्म मी केलें, असे मला वाटत नाहीं.पहा बरें,आमच्या पाहारे- कप्याने आमचा खजीना बरोबर राखला, तर त्यानें मोठे पुण्य जोडिलें किंवा आह्मांवर उपकार केले, असें आम्ही समजतो काय ? नाहीं. कां कीं, ते त्याचें क र्त्तव्यच आहे. तें तो न करील, तर मात्र तो गुन्हेगार होईल; परंतु तें करील तर तो मोठा पराक्रमी किंवा पुण्यशील, असें आह्नीं समजत नाहीं. त्याचप्रमाणें भाह्मी राजांनी प्रजांचें हरएक जुलमापासून रक्षण करावें हा आमचा धर्मच आहे, तो आाह्नीं पाळिला, तर मोठा शतक्रतु केला असें नाहीं. आतां उजेड कां नाहींसा केला ह्मणून ह्मणतोस, तर त्याचे कारण ऐक, न्याय बरोबर करण्यास सर्व साक्षित्व, निष्पक्षपातीपणा, आणि पूर्णसामर्थ्य ह्या तीन गोष्टी पाहिजेत. सर्व साक्षित्वाच्या योगानें अपराध्याची कच्ची हकीकत सम- जते; निष्पक्षपातीपणानें अपरराध्यास योग्य शासन, व निरपराध्यास शासनापासून मुक्तता, हीं करता येतात; आणि पूर्ण सामर्थ्याच्या योगानें केलेले ठराव बजावितां - ह्मणजे अमलांत आणितां येतात; असें आहे. जे अप-