पान:मधुमक्षिका.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८ )


 ईं बादशाहाचें कृत्य पाहून जवळच्या लोकांस मोठा अचंबा वाटला. आणि ते आपसांत कुजबुजू लागले. तथापि असें,विचारण्या याचे कारण काय, असे बादशाहाला कोणाला धीर होईना. तेव्हां तो निष्कपटीव भला शेतकरी बादशाहापुढे येऊन हात जोडून ह्मणाला, "महाराज, एक विनंती आहे; ती अभय असल्यास करीन" बादशाहा बोलला, "बोल कायतें; अभय आहे." शेत करी मोठ्या आदबीनें ह्मणाला, "खुदावंत, माझी गरीबा- ची दाद घेऊन आपण तसती घेऊन येथवर येऊन दुष्टाचा नाश केला, येणेंकरून आपले मजवर अपरिमित उपकार झाले आहेत. परंतु, प्रभूंनीं, येथें आल्या- बरोबर सगळा उजेड नाहींसा केला, परमेश्वराच्या जयघोषाचे गडबडींत दुष्ट मारला, त्याचें प्रेत पाहिल्या- बरोबर डोळ्यांतून अश्रुधारा वाहूं लागून परमेश्वराची प्रार्थना केली, आणि राजाधिराज असून कोरडीच भाकर आहेत, तेवढीं राजमुखानें ऐकावी, अशी सेवक जनांची इच्छा आहे. ती पुरविणार प्रभु समर्थ आहेत." हैं ऐकू. न घेऊन बादशाहानें उत्तर केलें, "अरे चतुर पुरुषा त्यांची कारणें मी यथाक्रम सांगतों तीं ऐक. ग्रीस देशा- मध्यें प्राचीन काळी सात महाविद्वान पुरुष होऊन गेले. त्यांच्या मध्ये एके दिवशीं असा प्रश्न निघाला कीं, "लोकांस हितावह असें राज्य कोणतें?" त्याची उत्तरें साहा असामींची वेगवेगळालीं पडलीं. नंतर त्यांच्या मधला मुकुटमणी जो सोलन नामा तत्वज्ञानी, त्यानें असें उत्तर दिलें कीं, 'ज्यांत गरीबगुरिबांची दाद चांगली लागते