पान:मधुमक्षिका.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २७ )


केलें. तें ऐकून बादशाहा अत्यंत खिन्न झाला, आणि उष्ण श्वास टाकून त्यास बोलिला, "बरें आहे; जा तूं आतां; कांहीं फिकीर करूं नको; इतकें मात्र कर कीं, तो आज रात्रीं तुझे घरांत आला ह्मणजे तूं तात्काळ येऊन मला कळीव, ह्मणजे मी सर्व वंदोबस्त करीन."" नंतर प्रहर रात्रीच्या सुमारास तो दुष्ट नित्याप्रमाणे त्या शेतकऱ्याच्या घरांत शिरून त्याच्या स्त्रीशीं रत झाला. हैं पाहून, संकेताप्रमाणें, तो शेतकरी बादशाह कडे गेला, आणि त्याला त्यानें सूचना केली. तेव्हां बादशाहा | आपणाबरोबर फक्त २५ स्वार व मशाला घेऊन मोठ्या लगबगीनें निघाला तो थेट शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन उभा राहिला. बादशाहाने स्वारां- कडून लागलाच घरास वेढा घालविला; व सगळ्या मशाली विझवविल्या; आणि घरांतील मनुष्यांस दरवाजा उघडण्याविषयों पुष्कळ हाका मारविल्या, तरी कोणी ओ देईना कीं दार उघडीना. तेव्हां बादशाहानें कुन्हाडी घालून दरवाजा फोडावला, आणि आंत जाऊन प्रथमतः दिवे मालविले. नंतर त्या मनुष्यास पकडून एकदम ईश्वराच्या नांवानें मोठा जयजयकार करून त्या गडबडींत त्याला ठार मारिलें.

 इतकें झाल्यानंतर, दिवे लाववून बादशाहानें तें प्रेत पाहातांच त्याच्या नेत्रांतून खळखळां अश्रुधारा वाहूं लागल्या. आणि हात जोडून व गुढगे टेंकून व डोळे मिटून तो परमेश्वराची प्रार्थना करूं लागला. ती पल्यावर त्या शेतकऱ्याकडून त्यानें थोडीशी भाकर भाणवून ती कोरडीच खाल्ली, आणि पाणी प्यालें.