पान:मधुमक्षिका.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६ )


आपली मंजुरी स्वमुखानें सांगतो, अथवा ती लिहून प्रकट करितो. एकादा कायदा पार्लमेंतानें पसार क रूनही जर, तो राजास आवडला नाही, तर आपणाला तो न आवडल्याबद्दलचा आपला अभिप्राय तो मला हा साफ आवडत नाहीं" अशा उद्धत भाषणानें दर्शवीत नाहीं; तर 'ह्याविषयीं मला कांहीं बोलायाचें आहे' असे सौम्य व सभ्य रीतीनें तो दर्शवितो. ह्यावरून पार्लमें- ताचा मान व दर्जा हे केवढे आहेत ते पाहा !! असो.
 न्याय करणें, राज्यकारभार चांगले रोतीनें चालवि- ण्यास राजास मदत करणे, व हरएक प्रसंगी त्यास सल्ला व मसलत देणें, हें पार्लमेंताचें मुख्य कर्त्तव्य कर्म आहे.


न्याय.

 कोणा एका मुसलमान बादशाहाची स्वारी फिरतां फिरतां अलवार नामक शहरों गेली होती. तेथे त्याच्या मोठ्या सैन्याचा तळ बरेच दिवस पडला होता. त्या मध्ये कोणी एक लष्करी अंमलदार फार अविचारी व दुराचारी होता. तो नित्यशः रात्रीं शहरांत जाऊन एका शेतकऱ्यास त्याचे घरांतून मारहाण करून हुसकून लावून त्याच्या सुंदर व तरुण स्त्रीचा उपभोग घेत असे. शेतकऱ्यानें त्याला नाना प्रकारांनी बोध केला, व त्याचे पायही धरिले, तरी तो कामांध कांहींच ऐकेना. शेवटी त्या- नें खुद्द बादशाहाची गांठ घेऊन त्यास ती सर्व हकीकत सांगितली. बादशाहा त्याला त्याच्या खुणामुद्रा विचा रूं लागला. तेव्हां त्यानें त्याचें सर्व यथास्थित वर्णन