पान:मधुमक्षिका.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५ )


ष्टींचा विचार करावा, आणि जें बहुमतें ठरेल तें, सभा- सदांपैकी एका विद्वान पुरुषानें बोलून दाखवावें, अशी वहिवाट आहे. एकाद्या सभासदावर कांहीं आरोप आल्यास, त्याची चौकशी, त्याच्या बरोबरीच्याच कांहीं सभासदांनी करावी, असा पाठ आहे.
 साधारण, लोकांच्या मुक्त्यारांची सभा. - हिजमध्यें सध्या ६५८ लोक आहेत. त्यांपैकी ५०० इंग्लंदा- च्या वतीचे, ५३ स्कातूलंदाच्या वतीचे, व १०५ ऐरलं- दाच्या वतीचे, असे आहेत. हे लोक निरनिराळ्या प्रां- तांतून निरनिराळ्या लोकांनीं पाठविलेले असतात. त- यापि, एकंदर सर्व रयतेस सुख होईल, अशा गोष्टी त्यां- नीं केल्या पाहिजेत, असा समज आहे. ह्या सभासदांच्या नेमणुका कोठें कोठें लोकांच्या हातीं आहेत, व कोठें को- ठें सरकारी नौकरांच्या हाती आहेत. ज्यांस दरसाल पां. सात हजार रुपयांचे उत्पन्न असेल, व जो अब्रूने मोठा असेल त्यासच ह्या सभेत जागा प्राप्त होते. को- णत्याही सरकारी कामास पैसा देणें झाल्यास त्याज- विषयों प्रथमतः ह्या सभेची मान्यता घ्यावी लागते ; नंतर तें प्रकरण बडे लोकांची सभा व राजा ह्यांचे पुढे जावें, अशी वहिवाट आहे.
 पार्लमेंत सभा. - राजा व पूर्वी सांगितलेल्या दोन सभा ह्यांस, पार्लमेंत, असे एकवट नांव आहे.फक्त त्या दोन सभांसही पार्लमेंत असें ह्मणतात.हा दुसरा अर्थच ह्या ठिकाणी ग्राह्य आहे. दोन्ही सभांनी मंजूर केला, परंतु तो जर राजास पसंत नाँहीं, तर तो कदापि अमलांत यावयाचा नाहीं. राजा
एकादा कायदा

3