पान:मधुमक्षिका.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४ )


सभा ही होय. तींत दोन भाग आहेत. १ ला बडे लोकांची सभा; व २ रां सामान्य लोकांच्या मुक्त्यारांची सभा. बडे लोकांच्या समेत सुमारें ४६२ गृहस्थ आहेत; व लोकांच्या मुक्त्यारांच्या समेत सुमारें, ६.०० लोकांहून अधिक आहेत.
 बड़े लोकांची सभा. - ह्या सभेत मुख्यत्वें दोन प्रका रचे बडे लोक असतात. ते हे कीं, सरदार अथवा उमराव लोक; आणि धर्माध्यक्ष अथवा पाही लोक. ह्या सभेतील सभासदांच्या जागा वंशपरंपरेनें चलतात. ह्या सभेत पाद्री लोकांस जागा आहे, तिचें कारण ते धर्माध्यक्ष आहेत ह्मणून नव्हे; तर, त्यांच्या कामाच्या संबंधाने त्यांजकडे जमीन पुष्कळ असते, ह्मणून त्यांत सभेत बोलाविण्याचा प्रघात पडून गेला आहे.ह्या समेत इंग्लंदच्या उमरावाच्या संख्येची कांहीं परंतु, स्कातलंदचे १६ असावे, असा पूर्वापार पाठ चालत आला आहे. सभेच्या दिवशीं स्वतः जाण्यास न बनल्पास कोणी चांगला मनुष्य आ पल्या वतीने पाठविण्यास सभासदास अधिकार आहे. ही सभा सर्वांत मोठी न्यायाची कचेरी आहे, असे सर्व इंग्लिश लोक मानितात. स्कातूलंदांतील जस्तिशियर न्यायसभा खेरीजकरून, वाकी सर्व न्यायाधीशांचे निवा- ड्यांवर अपील घेण्यास व त्याचा योग्य निकाल कर ण्यास ह्या सभेला अधिकार आहे. तथापि बडे लोक खुद्द बसून न्याय निवडतात असे नाहीं. अपिलें घ्यावीं, पुरावा पाहावा, पूर्वी ज्यांनी त्याचा फैसल्ला केला असेल, त्या न्यायाधीशांचे अभिप्राय आणवावे, सर्व ग्रो-