पान:मधुमक्षिका.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३ )


पाताच्या मान्यतेवांचून व्हावयाचें नाहीं. सारांश, प्रजेवर कर बसविण्याचा व तो वसूल करण्याचा अधि कार राजास स्वतंत्रपणे नसल्यामुळे, तो अगडबंब, परंतु स्वतःसिद्ध चलनवलनास असमर्थ, अशा शरीराप्रमाणे आहे. अथवा, राजा हें एक मोठे जाहाज उत्कृष्ट प्रतीच्या मालाने भरून तयार असें आहे; त्याला पार्ल- मेंत सभा, हा समुद्र आपणावर येऊं देईल, तरच तें चालेल; नाहीं तर खडकावर पडलें राहील, अशी 'शोभेल. "- पार्लमेंत सभा भरवि- ण्याचा अधिकार राजाला आहे. ती भरण्याबद्दल अगोदर चाळीस किंवा पन्नास दिवस त्याला राजांच्या प्रसिद्ध करावी लागते. प्रसंग पॅडल्यास राजाच्या संमतीवांचूनही पार्लमेंत सभा भरते.- राजाच्या खुद्द खासगी खर्चाकडे पूर्वी भारी पैसा दिलेला असे. परं- तु विकतोरिआ महाराणी सिंहासनावर बसली, तेव्हां तिच्या खर्चाकडे दरमाल ३८५०००० रु० नेमणुकी- चा ठराव झाला. ह्याखेरीज तिच्या कुटुंबांतील मनु- ष्यांच्या नेमणुकी वेगळ्या आहेत. ही राणी हिच्या पूर्वी जो राजा इंग्लंदाच्या गादीवर होता त्याची पुतणी. ही इ० स० १८३७ त गादीवर बसली.इ० स० १८४० त हिचें लग्न प्रिन्स आवर्त ह्याशीं झालें, तो इ० स० १८६४ त मरण पावला. ह्या राणीला नऊ मुले आहेत, व राज्यकारभार चालविण्यासाठी हिजपाशीं १६ प्रधान आहेत; सरकारी कामासाठी मोठमोठे कचे- प्यांचे वाडे ४२ आहेत; शिवाय, इनसाकाचीं सात कोर्ते आहेत. ह्या कोर्तात सर्वांत वरिष्ठ कोर्त पार्लमेंव