पान:मधुमक्षिका.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२ )


रीन; आणि ह्या पथाच्या उपदेशकांस भजनालयें वगैरे जे कांहीं दिलेले आहे, तें तसेंच चालवीन" अशी शपथ त्याला सर्व लोकांसमक्ष घ्यावी लागते. - कायदे ठरावणें, ते अमलांत आणणे, न्याय, तह, लढाया वगैरे करणें, पदव्या देणे ही कामें राजाच्या नांवानें होतात; तथापि अगदीं स्वतंत्रपणे त्यांपैकी एकही काम करण्या- चा त्याला अकत्यार नाहीं. तो मुख्याधिकारी नांवानें मात्र आहे. - राजा ज्ञेवरून प्रधानाने किंवा दुसऱ्या एका- द्या मोठ्या अधिकाऱ्याने कांहीं कृत्य केले, आणि त्याचा परिणाम वाईट झाला, तर त्याचा दोष लोक राजाला लावीत नाहीत, तर, त्या प्रधानाला किंवा अधिका-याला लावतात.“राजाच्या हातून कधी अपराध घडत नाहीं" अशा अर्थाची जी एक ह्मण इंग्लिश लोकांत आहे, ती ह्यावरूनच पडली असावी.-सरकारी फौजेस व आरमारास जो पैसा लागतो, त्याची सगळी लगाम साधारण लोकांच्या मुक्त्यारांच्या सभेच्या हातीं असते. तेणेंकरून राजाला प्रजेच्या अनुमतानें वर्तावें लागतें; व तिचें हरएक प्रकारच्या जुलमांपासून संरक्षण करावें लागतें. - इंग्लंदच्या राजाच्या अधिकाराविषयीं एका विद्वान ग्रंथकारानें असें लिहिले आहे की, " इंग्लंदच्या राजास फौजेवर व आरमारावर हुकूम चालविण्याचा अधिकार आहे; परंतु, पार्लमेंताच्या संमतीवांचून तो त्यांस नौकरीस ठेवण्यास मुखत्यार नाहीं. तो लोकांस पदव्या देण्यास मुक्त्यार आहे; परंतु, त्या अंमलांत आण- ण्यास पार्लमेंताचें अनुमत पाहिजे. लढाई करण्याचें ठरविणें हें राजाकडे आहे; परंतु, ती चालविणें हैं