पान:मधुमक्षिका.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१ )


मुलगे असतील, तर वडिलास गादी मिळावी; जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तर मुलग्याला मिळा- वी; सगळ्या मुलीच असतील, तर थोरलीस मिळावी, एक मुलगी आणि एक बहीण असेल, तर मुलीस मि ळावी; मुलें मुळींच नसलीं तर, भाऊ आणि बहिणी, ह्यांत वयानें व नात्यानें ज्याचा विशेष हक्क पोंचेल, त्यास मिळावी; ह्याप्रमाणें राजाची गादी देण्याची वहि- बाट चालू आहे. तथापि, योग्य दिसल्यास, हे नियम मोडून व्यवस्था करण्याचा अधिकार, पूर्वी सांगितलेल्या दोन सभांस ह्मणजे पार्लमेंतास आहे. - राजकुलांतील मनुष्यानें क्याथलिक मताच्या माणसाशी लग्न लावूं नये; राजकुलांत उत्पन्न झालेल्या कोणाचेंही लग्न राजाच्या अभिप्रायावांचून होऊं नये; लम होण्यापूर्वी कांहीं दिवस ज्याला लग्न कर्तव्य असेल त्यानें त्याविषयींचा आपला बेत प्रसिद्ध केला पाहिजे. इतके करूनही तो त्याचा लग्नसंबंध पार्लमेंत सभा नापसंत करील, तर तें लग्न लागावयाचें नाहीं; अशा लग्नाच्या अटी आहेत. - राजा लहान असल्यामुळे अथवा कांहीं कामा- निमित्त तो परदेशीं गेल्यामुळे, अथवा दुसऱ्या एकाद्या योग्य कारणामुळे, तो कारभार चालविण्यास असमर्थ असेल, तर त्याचें काम करण्यास योग्य मनुष्य नेम- प्याचा पार्लमेंत सभेस अधिकार आहे. - राजा प्राते- स्तंत पथाचा असला पाहिजे.- राजास राज्याभिषेक होतो त्यावेळीं, "मी सर्व राज्य पार्लमेंताच्या काय द्यांप्रमाणें व देशरीतीप्रमाणे चालवीन; न्याय आणि कायदे ह्यांच्या अनुरोधानें वागेन; मातेस्तंत पय आच-