पान:मधुमक्षिका.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २० )


लागला. . सर्व हकीकत विचारून घेतली; आणि त्याला मोठें काम सांगून सुखी केलें. पुढें खऱ्या खुनी मनुष्याचाही पत्ता त्याला धरून आणून त्याजवळचें सगळें द्रव्य घेतलें; आणि त्याला जिवें मारिलें. अलूकंदराचें . पुढचें सर्व आयुष्य सुखांत गेलें. त्यानें आपल्या समा- धीच्या दगडावर खोदण्यासाठी एक वाक्य लिहून ठेवि- लें होतें; त्याचें तात्पर्य येणे प्रमाणे :-

आर्या,
विश्वंभर जीपासुन, पाडूं न शके सुदीन जन पार
ऐशी दुःखावस्था, लोकीं नाहींच फार अनिवार ॥१॥

ब्रितन देशांतील राज्यव्यवस्था.

 ह्या देशाचा बहुतेक भाग हलों इंग्लिश लोकांच्या ताब्यांत आहे. त्याचा राज्यकारभार ते कसा चालवि. तात, हें नेहमीच्या वहिवाटीवरून व इतिहासावरून समजतच आहे. आतां, जेथें आपला मुख्य राजा राहतो, व जेथून ह्या देशाच्या राज्यव्यवस्थेची सूत्रे हा. लतात, त्या इंग्लंद देशाच्या राज्यसत्तेचें संक्षिप्त वर्णन करितों.
 इंग्लंदची राज्यसत्ता ही, राजा, बडेलोकांची सभा, व साधारण लोकांचे मुक्त्यारांची सभा, ह्या तिघांचे मिळून हात आहे.
 राजा.- नार्मन लोकांनी इंग्लंद काबीज केल्यापूर्वी काय असेल तें असो, पण त्यांनी तें काबीज केल्यावर. पुढे त्या देशाचा राजाधिकार वंशपरंपरेनें चालत आला आहे. तो असा. राजा मरेल आणि त्याला अनेक