पान:मधुमक्षिका.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९ )


हे बुवा निजलेले होते, ते आयतेच सांपडले. मग अलकंदराची अवस्था काय पुसावयाची आहे ? त्याला प्रथमतः खूब मारिलें; चतुर्भुज केले, आणि चौकशी होऊन शिक्षा करण्यासाठी, मुख्य न्यायाधिश जो सेप्ताम- यस ह्याच्या कचेरीकडे चालविलें. तेव्हां त्याने आपले जीवाची आशा सोडिली; आणि माझ्या प्रारब्धीं अशीं व दुःसह दुःखें भोगावयाची आहेत, तर कसा तरी ल- वकर एकदां जीव जावो, असें तो मनांत आणूं लागला. स्वसंरक्षणाविषयीं मी एकही शब्द बोलिलों नाहीं, ह्मण- जे मजवर अपराधाची शाब्दिी होऊन, माझें इच्छित कार्य लवकर सिद्धीस जाईल, असें मनांत आणून त्यानें मौन धरण्याचा निश्चय केला. अशा स्थितीत तो न्या- याधीशापुढे उभा राहिला. तो त्याचा अन्याय पाहून त्याला आतां मरणाची शिक्षा सांगणार इतक्यांत, त्याची नजर कैदीच्या तोंडाकडे गेली. तें उपासांनी व दुःखांनी अगदी वाईट होऊन गेलें होतें. तेणेंक- रून तो सेप्तिमियस ह्यास प्रथमतः ओळखतां आला ना- हीं. परंतु, अंधारांतल्या एकाद्या पदार्थावर, प्रकाश- किरण जरी अंधक पडले असले, तरी त्याजकडे टक लाविली असतां, तो सहज ओळखतो; त्याप्रमाणे सेप्ति - मियसानें अलूकंदराचें तोंड ओळखिलें. आणि ता- त्काळ सिंहासनावरून खाली उडी टाकून त्याचे गळ्या- स गच्च मिठी मारली. तेव्हां अल्कंदराचा आनंद त्रैलोक्यांत मावेना ! उभयतांच्या नेत्रांतून प्रेमाश्रूंच्या धारा चालल्या; हे पाहून लोकांस फार नवल वाटले. नंतर, सेप्तिमियसाने आपल्या प्रिय मित्रापासून त्याची