पान:मधुमक्षिका.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८ )


तेथें अलूकंदर जाऊन, इतर गरीब लोकांच्या गर्दी- त उभा राहिला.त्याला विचारतो कोण ? माझा मित्र मला ओळखील अशी आशा धरून तो त्याजकडे एक- सारखा टक लावून पाहात होता. पण ती सर्व आशा व्यर्थ गेली. संध्याकाळ झाला. तेव्हां, आपणच जा ऊन त्याला आतां ओळख द्यावी, अशा बेतानें तो हळू- हळू न्यायासनाकडे चालला. त्याला शिपायांनी मज्जाव ह्मणून, दोन गचंड्या देऊन हांकून लाविलें. नंतर अंधार पडला; तेव्हां, आतां निजावें कोठें, आपणाला जागा कोण देतो, हा विचार त्या विचाऱ्यास प्राप्त झाला. रस्त्यांत पडावें, तर काय होईल कोण जाणे, असें मनांत आणून तो गांवाबाहेर एक जुनी मशीद होती, तींत जाऊन निजला.
 तेथें निजावयास खालच्या फरसबंदीवांचून दुसरें. कांहीं त्याला नव्हतें. तथापि, 'भुकेला कोंडा आणि 'निजेला घोंडा' ह्या ह्मणीप्रमाणे त्याला तेथें गाढ झोंप लागली. मध्यरात्र झाली, जिकडे तिकडे सामसूम होऊन गेले. इतक्यांत, दोन चोर, एका माणसाचें घर फोडून आंतील सर्व द्रव्य घेऊन, वांढे करण्याक- रतां त्या भयाण मसीदीच्या पुढच्या मैदानांत आले. त्यांचे लहान मोठ्या भागांविषयीं भांडण लागले. तेव्हां एकानें आपली तलवार उपसून दुसऱ्यावर बार केला. तेणेंकरून तो तात्काळ मरण पावला; आणि पहिला सर्व द्रव्य घेऊन पळून गेला. पुढे उजाडलें. तरी तें प्रेत तेथेंच पडलें होतें. तें जवळच्या लोकांनी पाहून, मसीदींत कोण आहे, ह्याची चौकशी केली. तों आंव