पान:मधुमक्षिका.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७)


ग्रामस्थ त्याला छळू लागले. त्यांची त्यानें नाना प्र. कारें समजून केली; तरी ते कांहींच ऐकेनात.त्यांनीं त्याला जातिबहिष्कृत केले, आणि त्याजपासून पुष्कळ दंड घेण्याचे ठरविलें. तो त्याच्यानें देववेना ह्मणून त्यांनीं त्याची जिनगी जप्त केली. तिजपासूनही पुरती रकम उत्पन्न झाली नाहीं. तेव्हां त्यांनी त्यालाच थ्रेत येथील एका व्यापायास विकलें, आणि दंडाची रकम भरून घेतली. ह्या प्रमाणे अलूकंदर गुलाम होऊन राहिला.
 अलूकंदराचा धनी फार निर्दय होता. त्यानें त्याला आपलीं गुरे राखण्याचे कामास लाविलें; आणि सांगि- तले की, तुला खायाप्यायाला घरांतून कांहीं एक मि ळावयाचें नाहीं; तं आपली उपजीविका पाहिजे तशी शिकारीवर कर. ह्या आज्ञेप्रमाणे वागणे त्याला भाग पडले. दररोज उजाडले ह्मणजे, आज कांहीं पोटाला मिळेल की नाहीं, ह्या चिंतेत तो असे. हिवळा आणि पावसाळा हे तर त्याला प्रति मृत्युच वाटत असत. कां कीं, आंग आच्छादण्याला त्याजवळ एक देखील धड वस्त्र नव्हतें. तीन तीन दिवस खडखडीत उपास काढावे लागत; तेणेंकरून आंगांत शक्ति नाहींशी झाली. तेव्हां. ह्या अशा दास्यापेक्षां मरण पुरवलें, असा विचार करून, त्यानें पळून जाण्याचा निश्चय केला; आणि त्याप्रमाणें धन्याचा डोळा चुकावून संधि साधिली. दिवसास गुहांत लपून बसावें, आणि रात्रों मजल करावी, असे करीत करीत तो रोम शहरीं आला. त्याच दिवशी त्याचा जिवलग मित्र, सेप्तमियस, हा शहरच्या एका अफाट प्रसिद्ध जागों आपलें दरबार भरून इनसाऊ करीत होता.
.