पान:मधुमक्षिका.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६ )


त्याची शेवटची चाकरी करावी, ह्मणून तो आपल्या भावी पत्नीसहवर्तमान त्याजपाशीं जाऊन बसला. ती जवळ येतांच से.मियसाचे चर्येत फरक पडला तो जवळच्या वैद्यांच्या दृष्टोत्पत्तीस आला. तेव्हां, तुझ्या दुखण्याचें कारण हेंच काय ? असे त्यांनी त्याला खोदखोदून विचारिलें. त्यावेळी त्यानेंही तें, हो, ना, ह्मणत कबूल केलें.
 ह्या प्रसंगों अलूकंदराच्या मनाची जी स्थिति झाली असेल, ती लिहिलेली वाचण्यापेक्षां वाचणारांस सहज लक्षांत आणितां येईल. आतां करावें काय, हें त्याला सुचेना. त्यावेळेच्या सुमारास अथीनियन लोकांच्या अंगच्या सद्गुणांची इतकी पराकाष्ठा झाली होती कीं, परोपकारार्थ ते आपल्या जीवांकडे किंवा प्रतिष्ठे- कडे सुतरां पहात नसत. अलूकंदरानें, आपल्या सु- खाकडे व अब्रूकडे लक्ष्य न देतां, मित्राचा जीव वाचवि- ण्यासाठी, हैपाशिया हिचे लग्न सेप्तिमियस ह्याशीं लाव- ण्यास अनुमत दिलें. त्याप्रमाणें तें गुप्तपणे लागलें. सेप्तिमियस खडखडीत बरा झाला. आणि तो लागला- च आपल्या प्रियेसहवर्तमान मोठ्या आनंदानें रोम शहरास गेला. तेथें त्याच्या विद्वत्तेप्रमाणे त्याला सर- कारची कामे मिळत जाऊन, चढतां चढतां तो मुख्य न्यायाधीशाचें पद पावला.
 इकडे अलूकंदराला, आपल्या हातची बायको गेली, व ती ज्या साठीं खर्चिलो तो मित्रही सोडून गेला, ह्याचें परम दुःख झालें, इतक्यानेंच संपलें नाहीं. तूं पैसा घेऊन बायको विकली, अशा आरोपानें त्याचे