पान:मधुमक्षिका.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५ )


होता. ते दोघे सहाध्यायी होते. अल्कंदर ह्याची बुद्धि तीक्ष्ण असून त्याचे विचार गहन असत; आणि सेप्तिमियस हा मोटा वक्ता होता. दोघांच्याही विद्व- त्तेची चोहींकडे मोठी प्रसिद्धि होती. ते एकमेकांवर पराकाष्ठेची प्रीति करीत असत.
 बराच विद्याभ्यास झाल्यावर अलूकंदरास वाटलें कीं, आतां आपण घरदार करावें. ह्मणून त्यानें हैपाशिया नामक एका रूपवती तरुण स्त्रीशी लग्न करण्याचा बेत ठरविला. लग्नाची सगळी तयारी होऊन राहिली; वेळ नेमिली; आणि लग्न लागण्यापूर्वी जे कांहीं शिष्टा- चार व्हावयाचे, तेही होऊन गेले. पुढे लग्न लागणार, इतक्यांत, ह्या समारंभास आपला जिवलग मित्र सेप्तिमि- यस ह्यास बोलवावें, असें अलकंदराच्या मनांत भालें, आणि त्याने लागलेच त्याला बोलावून आणिलें. सेप्ति- मियस तेथें येऊन बसतो सवरतो इतक्यांत, नवरी मुल- गी, हैपाशिया, वस्त्रभूषणांनीं मंडित अशी त्याच्या दृष्टीस पडली. तिला पाहतांच त्याचे मनांत तिजविषयों कामवासना अशी प्रबल उत्पन्न झाली कीं, ती सांगतां पुरवत नाहीं. तिने त्याची अगदर्दी उचल केली. विद्या, ज्ञान, शाहाणपण, मानापमान, लोकरीति, हें सर्व तो अगदीं विसरून जाऊन वेड्यासारखे चाळे करूं लागला. आणि त्याला तापही पराकाष्ठेचा भरला. त्याची प्रकृति पुष्कळ वैद्यांनी पाहिली; पण त्यांस कांहींच परीक्षा होईना. तेव्हां, आतां हा हातीं लागत नाहीं, असें सर्वांस वाटलें. अल्कंदराचें लग्नही खोळंबलें. , आपला मित्र मरतो, त्या अर्थी आपण