पान:मधुमक्षिका.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४ )


परंतु, त्यांनी मनांत असें पक्के समजावें कीं, गर्भसंभ- वादि गोष्टी, ज्या, मनुष्यास त्यांची लक्षणे बाहेर दिसूं लागल्यावांचून कळत नाहीत, त्या, पशुपक्ष्या उत्पन्न झाल्यावरोबर समजतात. तेव्हां, ते सर्वोपरी भापणांपेक्षा नीच आहेत असें नाहीं. त्यांचे ठायीं- ही परमेश्वराने असे कितीएक गुण ठेविले आहेत की, ते कोणत्याही उपायानें मनुष्यास प्राप्त व्हावयाचे ना- हीत. धागे, दोरे, शेवाळ, माती, इत्यादि साहित्य मनुष्यापुढे ठेविलें, तर त्याच्यानें, आपली सगळी अक्क-, ल खर्चून तरी चिमणीसारखें घरटें बांधवेल काय ? नाहीं ! तर मग एवढा गर्व तो कशास पाहिजे ?
 असो भगवंताच्या लीलेचें वर्णन करावें तितकें थोड़ें- न्च. त्याचे ह्या जगावर अनंत उपकार आहेत. उत्पत्ति, स्थिति, आणि लय, ही त्याचीं साहजिक कमें होत. सर्व विश्वचालक तो आहे. आणि परिणामी सर्वांस त्यापाशीं जाणे आहे. ह्यास्तव, विश्वावलोकनावरून त्याचें चातुर्य, दयालुत्व, आणि सर्वशक्तित्व हीं मनतां आणून त्याला अनन्य भावें शरण रिधावें, हेंच सुज्ञ जनांस उचित होय.


अलूकंदर आणि सेप्तिमियस.

 ग्रीस देशामध्यें अथेन्स ह्मणून एक प्रख्यात शह आहे, तेथें प्राचीन काळी एक मोठें विद्यालय होतें. त्यांत अल्कंदर आणि सेप्तिमियस ह्या नांवांचे दोन विद्यार्थी होते. ह्यांतील पहिला अथेन्सचा राहाणारा होता; व दुसरा रोम शहराहून तेथें विद्याभ्यासाकरितां आला